Drishyam 3 Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

Drishyam 3 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. तीन दिवसांत चित्रपटाने १७६ कोटींचा नेट टप्पा गाठला असून, आतापर्यंत चौथा सर्वात मोठी कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

Shruti Vilas Kadam

Drishyam 3 Box Office Collection: २०२६ हे वर्ष बॉलीवूडसाठी बॉक्स ऑफिसच्या दृष्टीने दमदार ठरत आहे. यावर्षी अनेक मोठ्या बजेटचे आणि बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले असून त्यांनी बॉक्स ऑफिसवर शानदार कामगिरी केली आहे. धुरंधर: द रिव्हेंज, हनुमान अंश यांच्यानंतर आता अजय देवगणच्या 'दृश्यम ३'नेही कमाईचा धडाका कायम ठेवला आहे. २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे.

'दृश्यम ३'ने रिलीजच्या पहिल्याच दिवशी दमदार सुरुवात करत ६२ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली. ही यावर्षीच्या हिंदी चित्रपटांमधील दुसरी सर्वात मोठी ओपनिंग ठरली आहे. विशेष म्हणजे अजय देवगणच्या तब्बल ३५ वर्षांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ओपनिंग डे ठरला. त्यानंतर शनिवारीही चित्रपटाने ५० कोटी रुपयांहून अधिक नेट कलेक्शन केला.

रविवार ठरला कमाईचा ‘सुपर संडे’

रविवारी, 'दृश्यम ३'च्या कमाईत आणखी वाढ झाल्याचे दिसून आले. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने रविवारी सुमारे १७ हजार शोमधून ६१ कोटी रुपयांची नेट कमाई केली. शनिवारच्या तुलनेत रविवारी कलेक्शनमध्ये जवळपास १४ टक्क्यांची वाढ झाली. यासह तीन दिवसांत चित्रपटाचे भारतातील एकूण नेट कलेक्शन १७६.५० कोटी रुपयांवर पोहोचले. दुसरीकडे, तीन दिवसांत 'दृश्यम ३'ने जगभरात तब्बल २७२.८० कोटींची कमाई केली.

अजय देवगणने मोठ्या स्टार्सना टाकले मागे

पहिल्या वीकेंडच्या कमाईचा विचार केला तर 'दृश्यम ३'ने बॉलीवूडमधील चौथी सर्वात मोठी ओपनिंग केली आहे. या यादीत रणवीर सिंगचा 'धुरंधर: द रिव्हेंज' तसेच शाहरुख खानचे 'जवान' आणि 'पठाण' हे चित्रपट पहिल्या तीन स्थानांवर आहेत. या दमदार कामगिरीमुळे अजय देवगणने सलमान खान आणि आमिर खानसारख्या सुपरस्टार्सनाही मागे टाकले आहे.

सोमवारचा दिवस 'दृश्यम ३'साठी महत्त्वाचा ठरणार

आता सोमवारचा दिवस 'दृश्यम ३'साठी महत्त्वाचा ठरणार आहे. वीकेंडनंतर वर्किंग डेमध्ये कमाईत घट होणे साहजिक असते. मात्र, चित्रपटाने सोमवारीही चांगली कमाई केली तर, भारतात हा चित्रपट चार दिवसांत २०० कोटींचा टप्पा गाठेल. तसेच, आगामी काळात हा चित्रपट ४०० ते ५०० कोटी किंवा त्याहून अधिक कमाई करण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

Pitru Paksha : पितरांना प्रसन्न करण्यासाठी बनवा तांदळाची खीर, श्राद्धाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT