Yaariyan 2 Teaser Out Saam TV
मनोरंजन बातम्या

Yaariyan 2 Teaser: अ‍ॅक्शन-ड्रामासह उलगडणार नवी नाती; 'सनी सनी' गाण्याच्या नवीन व्हर्जनसह 'यारिया 2'चं टीझर प्रदर्शित

Yaariyan 2 Teaser Out : चित्रपटाच्या टीझरमध्ये सनी सनी या गाण्याचे नवीन व्हर्जन पाहायला मिळणार आहे.

Pooja Dange

Yaariyan 2 Movie Teaser Out : 2014 मध्ये, दिव्या खोसला कुमारने तिच्या यारियां चित्रपटाने कॉलेज रोमान्सची परिभाषा बदलली. आता 2023 मध्ये, त्याच्या यारियां 2 चित्रपटात चुलत भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधातील गोडवा चित्रित केला आहे.

राधिका राव आणि विनय सप्रू यांचा म्युजिकल परफॉर्मन्स दाखवणारा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये कुटुंबातील मित्राचा आणि मित्रातील कुटुंब हे दाखविण्यात आले आहे. यारियां 2 प्रेम, भावना आणि मैत्री नव्याने दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे.

हा चित्रपट उत्तम संगीतासह ड्रामा, इमोशन आणि कॉमेडी यांचे संपूर्ण पॅकेज आहे. हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या टीझरमध्ये सनी सनी या गाण्याचे नवीन व्हर्जन पाहायला मिळणार आहे. ज्यामुळे प्रेक्षकांची लोकांची उत्सुकता वाढणार आहे.

राधिका आणि विनय यांची नवीन ऑन-स्क्रीन जोडी यश दासगुप्ता, वारिना हुसैन, अनस्वरा राजन आणि प्रिया वारियर यांना प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. भवनदानमधील प्रेम प्रेक्षकांना नक्कीच आवडेल आणि चित्रपटाशी जोडले जातील असे निर्मात्यांनी म्हटले आहे. (Latest Entertainment News)

चुलत भाऊ-बहीण यांच्यातील बंध आणि मैत्री यांचे चित्रपटात खूप छान वर्णन करण्यात आले आहे. 'यारियाँ 2' मध्ये दिव्या खोसला कुमार, यश दासगुप्ता, अनस्वरा राजन, मीझान जाफरी, वारिना हुसैन, प्रिया वॉरियर आणि पर्ल व्ही पुरी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचा टीझर मुंबईत मोठ्या थाटात लाँच करण्यात आला.

20 ऑक्टोबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिव्या खोसला कुमार आणि आयुष माहेश्वरी यांनी निर्मित केली आहे. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी चित्रपटकडे दिग्दर्शन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breast cancer warning signs: महिलांनो.. स्तनाच्या त्वचेत हे ५ बदल होत असतील तर व्हा सावध; ब्रेस्ट कॅन्सरचा धोका असू शकतो

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Konkan Travel : कोकणात ट्रेकिंगसाठी ठिकाण शोधताय? मग 'हे' लोकेशन एकदा पाहाच

Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; २ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Sanjay Raut: ठाकरें बंधूंच्या युतीचा हनुमान; संजय राऊतांचा सन्मान, ठाकरेंसाठी राऊत महत्वाचे का?

SCROLL FOR NEXT