Disha Parmar Baby Shower  Instagram @dishaparmar
मनोरंजन बातम्या

Disha Parmar Baby Shower: वेस्टर्न लूक, क्युट केक अन भन्नाट सेलिब्रेशन; दिशा परमारच्या डोहाळ जेवणाचा न्यारा थाट

Disha Parmar-Rahul Vaidya: आई-वडील झाल्याचा आनंद राहुल आणि दिशाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता .

Pooja Dange

Disha Parmar-Rahul Vaidya Poses For Paparazzi:

टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री दिशा परमार आणि तिचा पती गायक राहूल वैद्य यांच्या घरी लवकरच छोट्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. दिशा आणि राहुल यांनी कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत डोहाळ जेवणचा कार्यक्रम आयोजित केला होता.

२४ ऑगस्टची संध्याकाळ दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्यासाठी खूप खास होती. राहुल आणि दिशाने मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये वेस्टर्न थीमवर आधारित बेबी शॉवर सोहळा आयोजित केला होता.

रेस्टॉरंटमधून बाहेर आल्यावर दिशा परमारने तिच्या पती राहुलसोबत पापाराझींना पोज देखील दिल्या. यादरम्यान, राहुल पत्नी दिशांची खूप काळजी घेताना दिसला. पत्नीच्या बेबी बंपवर हात ठेवून त्याने पोजही दिल्या.

दिशा परमारने बेबी शॉवर सोहळ्यातील झलकही शेअर केली आहेत. आई-वडील झाल्याचा आनंद राहुल आणि दिशाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. या जोडप्याच्या बेबी शॉवर केकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

दिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या बेबी शॉवरमध्ये पेस्टल ब्लू आणि पिंक थीम असलेला डबल टायर्ड केक होता. केकवर 'दिशूल बेबी' असे दोन बाळे होती, जी संपूर्ण केकचे वैशिष्ट्य होते. एका फोटोमध्ये दिशा आणि राहुल नाचतानाही दिसत आहेत. (Latest Entertainment News)

दिशाने तिच्या बेबी शॉवरसाठी वेस्टर्न लूक निवडला. बडे अच्छे लगते हैं 2 फेम अभिनेत्रीने लॅव्हेंडर रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला होता, त्यावर तिने पांढऱ्या चप्पल घाला होत्या. ग्लॉसी मेकअपमध्ये दिशा सुंदर दिसत होती. राहुल वैद्यने देखील पांढर्‍या पँटसह केशरी-पांढऱ्या प्रिंटेड शर्टमध्ये कॅज्युअल लूकमध्ये होता.

राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी एकमेकांना अनेक वर्षे डेट केल्यानंतर 16 जुलै 2021 रोजी मुंबईत थाटामाटात लग्न केले. या जोडप्याने यावर्षी मे महिन्यात प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. (Celebrity)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT