Disha Patani Instagram/@dishapatani
मनोरंजन बातम्या

Disha Patani: "ॲक्टिंग सोडून सगळं काही येतं..." दिशाचा बोल्ड अवतार बघून फॅनची भन्नाट प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या अभिनयाने नाही तर, कातिल करणाऱ्या नजरेने सर्वांना घायाळ करते.

Chetan Bodke

Disha Patani: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आपल्या अभिनयाने नाही तर, कातिल करणाऱ्या नजरेने सर्वांना घायाळ करते. दिशा नेहमीच सोशल मीडियावर तिचे बॉडी फ्लॉंट करताना दिसते. पण तिने यावेळी शेअर केलेल्या फोटोने सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधले आहे. दिशा पटनीने हॉटेलच्या खोलीतील तिचा बिकिनी फोटो शेअर केला आहे. मात्र, या फोटोमध्ये चाहत्यांना तिची बिकिनी नाही तर तिचा स्ट्रेच मार्क दिसत असल्याची चर्चा होत आहे.

दिशा पटनीने तिचा हा फोटो शेअर करत कोणतेही कॅप्शन दिलेले नाही. या फोटोमध्ये दिशा ॲनिमल प्रिंट बिकिनीमध्ये दिसत असून आरशासमोर सेल्फी घेताना दिसत आहे. या सेल्फीमध्ये तिची कर्वी फिगर सर्वांनाच घायाळ करत आहे. दिशाने यामध्ये न्यूड मेकअप केला असून तिच्या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

दिशाने हा फोटो नुकताच आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला असून या फोटोवर चाहत्यांनी तिच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. एक युजर म्हणतो, कर्वी फिगर, तर आणखी एक युजर म्हणतो, टायगर गेला, त्याने त्याची त्वचा तुला दिली, तर आणखी दुसरा म्हणतो, मिसिंग टायगर, ही टायगर प्रिंट मस्त आहे. तर एका युजरने तर हद्दच पार केली, म्हणतो, दिशाचे फोटो पाहून ऐन गर्मीत इंटरनेटचं तापमान वाढलं.

तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे, तर दिशा पटानी तिच्या आगामी प्रोजेक्टमध्ये सुर्यासोबत दिसणार आहे. ज्याचे दिग्दर्शन सिरूथाई शिवा करत आहेत. सुरुवातीला या चित्रपटाचे शीर्षक सूर्या 42 असे ठेवण्यात आले होते. हा चित्रपट तब्बल 10 भाषांमध्ये बनणार असल्याचे सांगितले जात आहे. या सगळ्याशिवाय दिशा करण जोहरच्या 'योद्धा' या आगामी चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. इतकेच नाही तर ती 'प्रोजेक्ट के' मध्ये प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Purnima 2025: सर्वात मोठा गुरुमंत्र कोणता? जाणून घ्या त्यामागील आध्यात्मिक कारण

Thackeray: ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? राज ठाकरेंच्या आदेशानं संभ्रम; पदाधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gold Price Today: गुड न्यूज! आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; १ तोळ्यासाठी किती रुपये मोजावे लागणार?

Kalyan Police News : वाहतूक पोलिसांची मनमानी, चहा पिण्यासाठी रस्त्यात गाडी उभी केली, ट्रॅफिक जाममुळे नागरिक संतापले

Maharashtra Live News Update : विदर्भातील सात जिल्ह्यात आज जोरदार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT