Ramayana Movie Shooting Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ramayana Movie: 'रामायण'ची तयारी पूर्ण; मुंबई आणि लंडनमध्ये 'या' महिन्यापासून सुरू होणार शुटिंग

Ramayana Movie: रामायण चित्रिकरण्याआधी रणबीर कपूरने दारू आणि मांसाहार वर्ज्य केलाय. रणबीर लेट नाईट पार्ट्यांनाही जात नसल्याचं म्हटलं जात आहे. प्रभू रामाचे हे पात्र साकारण्यासाठी त्याने हे केले आहे जेणेकरून तो त्या पात्राशी आध्यात्मिकरित्या जोडला जाईल.

Bharat Jadhav

Ramayana Movie Shooting :

सध्या दिग्दर्शक नितीश तिवारीच्या 'रामायण'ची बरीच चर्चा आहे. या चित्रपटात कोणते अभिनेते काम करणार आहेत, त्यांची नावे समोर आली आहेत. परंतु चित्रपट निर्मात्यांनी याविषयीची अधिकृत घोषणा अजून केलेली नाही परंतु येत्या काही दिवसात याची घोषणा होण्याची शक्यता आहे. याचदरम्यान 'रामायण' संदर्भात ताजी माहिती अशी की, नितेश तिवारी शूटिंगसाठी सज्ज झाला आहे. रणबीर कपूर भगवान रामाची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Latest News)

साई पल्लवी सीतेची तर 'केजीएफ' फेम यश रावणाची भूमिका साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे. 'रामायण'चे शूटिंग मार्च महिन्यापासून मुंबई आणि लंडनमध्ये होणार असल्याचं सांगितलं जात आहे. टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या एका वृत्तात सूत्रांच्या हवाल्यानुसार रणबीर कपूर मुंबईत ६० दिवसाचं शूटिंग करणार आहे. यानंतर निर्माते लंडनला जातील जिथे लंकेच्या भागाचे शूटिंग केले जाईल. तेथे देखील ६० दिवसात चित्रिकरण पूर्ण केले जाईल.

  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लंडनमध्ये यश रणबीरसोबत जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. 'रामायण' हा चित्रपट २०२५ च्या अखेरीस रिलीज करण्याची निर्मात्यांचा प्लान आहे. रिपोर्टनुसार, चित्रिकरण्याआधी रणबीर कपूरने दारू आणि मांसाहार वर्ज्य केलाय. रणबीर लेट नाईट पार्ट्यांनाही जात नसल्याचं म्हटलं जात आहे. प्रभू रामाचे हे पात्र साकारण्यासाठी त्याने हे केले आहे जेणेकरून तो त्या पात्राशी आध्यात्मिकरित्या जोडला जाईल. हाती आलेल्या माहितीनुसार,सनी देओल 'रामायण'मध्ये हनुमानाची भूमिका साकारणार असल्याचे जवळपास निश्चित झालंय.

'गदर २'च्या यशानंतर नितेश तिवारीने या भूमिकेसाठी त्याच्याशी संपर्क साधला आहे. यावर्षी सनी देओल मे महिन्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू करेल असं सांगितलं जात आहे. सनीसह लारा दत्ताला कैकेयीची भूमिका ऑफर करण्यात आलीय. विभीषणच्या भूमिकेसाठी विजय सेतुपती यांच्याशी बोलणी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. जर सर्व काही ठीक झाले तर बॉबी देओल कुंभकर्णाची भूमिका साकारू शकतो असं म्हटलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिक, अमरावतीनंतर यवतमाळमध्येही लव्ह जिहाद? 'यवतमाळमध्ये 34 अल्पवयीन मुली बेपत्ता'

Maharashtra News Live Update: अक्षयतृतीयाला गौराईचे वाजत-गाजत विसर्जन,आदिवासी परंपरा

विदर्भ भाजतोय! अकोला-वर्ध्यात तापमान ४५° पार, उष्णतेचा कहर

कोलकात्यात रिंकू सिंहचं वादळ, KKRने मिळवला पहिला विजय; अतितटीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्स पराभूत

Gold Rate: सोनं २ लाखांवर पोहोचणार? तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

SCROLL FOR NEXT