Diljit Dosanjh Mumbai concert on November 27 at Mahalaxmi Racecourse 
मनोरंजन बातम्या

Diljit Dosanjh Concert: मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर! शहरातील वाहतुकीत मोठा बदल, काय आहे कारण?

Diljit Dosanjh Mumbai Concert: दिलजीत दोसांझ यांचा २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे कॉन्सर्ट होणार आहे. संभाव्य गर्दी आणि धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा हाय अलर्ट जारी केला आहे.

Bharat Jadhav

  • पंजाबी गायक दिलजीत दोसांझ यांचा मुंबईत २७ नोव्हेंबर रोजी कॉन्सर्ट.

  • महालक्ष्मी रेसकोर्स येथे दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रम.

  • संभाव्य धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस हाय अलर्टवर.

पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझचा बहुप्रतिक्षित कॉन्सर्ट उद्या २७ नोव्हेंबर रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे होणार आहे. हा कॉन्सर्ट दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत असणार आहे. मात्र दिलजीत दोसांझ यांच्या कार्यक्रमात हल्ला करू अशा धमक्या दिल्या जातात, त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबईत होणाऱ्या कॉन्सर्टसाठी सुरक्षेचा हाय अलर्ट जारी केलाय. तसेच मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांसाठी विशेष ट्रॅफिक सुचना केल्या आहेत.

कॉन्सर्टमुळे महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली आणि केशवराव खाड्ये मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी या भागात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन मु्ंबई वाहतूक पोलिसांनी केलंय.

मुंबई पोलिसांनी दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्ग म्हणून कोस्टल रोडचा वापर करावा. यासह कार्यक्रमासाठी येणाऱ्या प्रेक्षकांनी वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक साधने जसे की बेस्ट (BEST) बस, लोकल ट्रेन आणि मेट्रो यांचा वापर करावा, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आलाय.

याआधी दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. ही गंभीर बाब लक्षात घेता मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केलीय. कॉन्सर्टदरम्यान संपूर्ण परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असणार आहे. मुंबई पोलिसांकडून कोणत्याही संशयास्पद हालचालींवर विशेष नजर ठेवली जाईल. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: आज ५ राशींचं नशीब चमकणार! कोणाला मिळणार आनंदाची बातमी? वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Update: एन. चंद्रशेखरन यांच्या फेरनियुक्तीला टाटा ट्रस्ट्सचे मुंबई हायकोर्टात आव्हान

UP Election: महिलांना ४००००ची पेन्शन, बेरोजगारांना ५००० रुपये; सपानं उघडला घोषणांचा पेटारा

Musician Death: प्रसिद्ध संगीतकाराचे ३१ व्या वर्षी निधन; झोपेतच घेतला अखेरचा श्वास, कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी

Kidney Health : नारळाचं पाणीही किडनीसाठी धोक्याचं? दररोजच्या आहारातील ९ पदार्थ नकळत वाढवतायत धोका

SCROLL FOR NEXT