Samantha And Naga Chaitanya  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Prabhu: समांथाच्या आजाराने नागाचैतन्य चिंतेत, सासरचे मंडळी जाणार भेटीला

समांथाची तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य आणि त्याचे वडील नागार्जुन भेट घेणार आहेत. तिच्या या आजराचे निदान झाल्याचे कळल्यापासून ते दोघेही अस्वस्थ आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

समांथा आपल्या आजारपणाने आणि चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे. समांथाला मायोसिटीस या गंभीर आजाराचे निदान झाल्यापासून बरीच चर्चेत आली आहे. नुकतेच समांथाने आपला रुग्णालयातील एक फोटो शेअर केला होता आणि या फोटोसोबत तिने आजाराची माहिती दिली होती. चाहत्यांना ही माहिती मिळताच चाहत्यांनी तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे.

समांथाची तिचा पूर्वाश्रमीचा पती नागा चैतन्य आणि त्याचे वडील नागार्जुन भेट घेणार आहेत. तिच्या या आजराचे निदान झाल्याचे कळल्यापासून ते दोघेही अस्वस्थ झाल्याचे बोलले जात आहे. समंथाला खरंच नागा चैतन्य भेटायला जाणार का ? याबाबत अजूनही स्वत: त्याने प्रतिक्रिया दिलेली नाही.

याआधी नागार्जुनचा मुलगा आणि नागा चैतन्याचा भाऊ अखिल अक्कीने याने समांथाच्या आजाराबाबत शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट केली होती. "तुला खूप सारं प्रेम आणि बळ, प्रिय सॅम" अखिलने असे कमेंट करत लिहिले होते.

२०१७ मध्ये समांथा आणि नागा चैतन्य लग्नबंधनात अडकले होते. पण त्यांचा संसार जास्त काळ काही टिकू शकला नाही. लग्नाच्या चार वर्षातच एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोघे एकमेकांना भेटले सुद्धा नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Update : राज्यभरात पावसाचा अलर्ट, पुढील 4 दिवस जोरदार पाऊस | VIDEO

JioSaavn Pro: जिओची जबरदस्त ऑफर! फक्त ९ रुपयांत JioSaavn Pro सबस्क्रिप्शन, जाहिरातीशिवाय हाय-क्वालिटी ऑडिओपर्यंत सर्व सुविधा फ्री

Maharashtra Live News Update: नरेश मस्के भाजपची चाकरी करतात, काँग्रेस खासदाराची टीका

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! दिवाळीआधी महागाई भत्त्यात होणार वाढ; पगार आणि पेन्शन कितीने वाढणार?

Alu Cha Fadfad Recipe : कोकणात बनवतात अगदी तसेच अळूचं फदफदं, गरमागरम भातासोबत घ्या आस्वाद

SCROLL FOR NEXT