Dhurandhar 2 saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: 'धुरंधर २' कायदेशीर अडचणीत; चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका दाखल

Dhurandhar 2 Legal Trouble: बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करूनही, 'धुरंधर २' हा चित्रपट कायदेशीर अडचणीत अडकला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण सविस्तरपणे जाणून घेऊया.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 2 Legal Trouble: दिग्दर्शक आदित्य धर यांचा बहुचर्चित ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर सगळे रेकॉर्ड ब्रेक करत आहे. सोशल मीडियापासून सगळीकडे या चित्रपटाची आणि त्यातील रणवीर सिंगसह प्रत्येक कलाकाराच्या कामाची चर्चा सुरु आहे.पण आता हा चित्रपट नव्या वादात सापडला आहे. मद्रास उच्च न्यायालयात या चित्रपटाविरोधात तातडीची याचिका दाखल करण्यात आली असून, तामिळनाडूमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहिता नियमांचा आधार घेत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, याचिकाकर्त्या वकिलाने न्यायालयात असा युक्तिवाद केला की, ‘धुरंधर २’ हा चित्रपट राजकीय विषयांवर आधारित असल्याने निवडणूक काळात त्याचे प्रदर्शन मतदारांवर परिणाम करू शकते. त्यामुळे या कालावधीत चित्रपटावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रकरणावर सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या खंडपीठाने याचिकाकर्त्याला फॉर्मल रिट याचिका (formal writ petition) दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतरच तातडीच्या सुनावणीसाठी अर्ज करता येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे चित्रपटावर स्थगिती द्यायची की नाही, याचा अंतिम निर्णय पुढील सुनावणीनंतरच होणार आहे.

चित्रपटाची कमाई

'धुरंधर २' हा चित्रपट १९ मार्च रोजी हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. पहिल्या पाच दिवसांत ८०० कोटींच्यावर कमाई करत 'धुरंधर २' ने 'पुष्पा २', 'बाहुबली २', 'RRR' आणि 'KGF 2' यांसारख्या मोठ्या 'ब्लॉकबस्टर' चित्रपटांनाही मागे टाकले आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसह आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन आणि राकेश बेदी या कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यातील पाबे घाटात कारचा भीषण अपघात; २०० फूट दरीत कोसळली

IPL New Rule : आयपीएल सुरू होण्याआधी नवे नियम आले, बीसीसीआयने केले 7 बदल; वाचा कुणाला होणार फायदा

धर्मांतर केल्यास SC/ST दर्जा मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल

New Banking Rules: आता QR कोड स्कॅन करा अन् एटीएममधून पैसे काढा; या बँकेने सुरु केली सेवा

Silver Rate Today : सोन्यानंतर चांदीचेही दर घसरले, एका दिवसात तब्बल ₹२०,०००ची घसरण;वाचा ताजे भाव

SCROLL FOR NEXT