Marathi Movie Poster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Movie Motion Poster: धोंडी-चंप्याला लग्नाची घाई; 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' चे हटके मोशन पोस्टर प्रदर्शित

'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' ही अनोखी प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Marathi Movie Motion Poster : 'धोंडी चंप्या: एक प्रेम कथा' ही अनोखी प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे नवीन पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. रेडा आणि म्हशीची जगावेगळी आणि हटके प्रेमकहाणी असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ज्ञानेश भालेकर यांनी केले आहे.

रिलायन्स एंटरटेनमेंट प्रस्तुत सुनील जैन आणि कल्ट डिजिटल यांच्या सहकार्याने, फिफ्थ डायमेन्शन आणि कल्ट डिजिटल निर्मित या चित्रपटात भरत जाधव, वैभव मांगले, सायली पाटील आणि निखिल चव्हाण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रभाकर भोगले यांच्या कथेला प्रेरित होऊन निर्मिती केलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद ज्ञानेश भालेकर आणि सागर केसरकर यांचे आहेत.

पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्यात आता या नवीन मोशन पोस्टरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. यात धोंडी आणि चंप्याला मुंडावळ्या बांधलेल्या दिसत असून ते लग्नासाठी आतुर असल्याचे दिसत आहेत. या पोस्टरवरून हा एक धमाल विनोदी सिनेमा असल्याचे कळत आहे. जरा हटके कथा असणाऱ्या या चित्रपटातील धोंडी आणि चंप्याची प्रेमकहाणी यशस्वी होणार का, हे पाहण्यासाठी सध्या तरी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर म्हणतात, "हा एक जबरदस्त विनोदी चित्रपट असून धोंडी चंप्याची एक आगळीवेगळी प्रेमकहाणी यात पाहायला मिळणार आहे. हळूहळू यातील एकेक गोष्टी समोर येतीलच."

या चित्रपटाचे सुनील जैन, आदित्य जोशी, व्हेनिसा रॉय, आदित्य शास्त्री हे निर्माते असून अमित अवस्थी, सुशांत वेंगुर्लेकर हे सहनिर्माते आहेत. येत्या १६ डिसेंबर रोजी धोंडी-चंप्याची अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT