Esha Deol SAAM TV
मनोरंजन बातम्या

Esha Deol : ‘ईशा देओल’ नं केला ‘वंदे भारत’ मधून प्रवास, पाहा VIDEO

Esha Deol Vande Bharat Journey : बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र यांच्या मुलीने ईशा देओलने वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला आहे. तिच्या या प्रवासाचा अनुभव तिने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून शेअर केला आहे.

Shreya Maskar

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध जोडी अभिनेते धर्मेंद्र आणि त्यांची पत्नी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. सिनेसृष्टीत मोठे नाव कमावले आहे. त्यांची मुलगी ईशा देओल (Esha Deol) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत असते. सध्या ईशाने आपला ‘वंदे भारत एक्सप्रेस’ चा अनुभव शेअर केला आहे. तिने आपल्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेत्री ईशाने बऱ्याच दिवसांनी रेल्वेने प्रवास केला. रेल्वे प्रवास करण्यासाठी अभिनेत्रीने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेन (Vande Bharat) पकडली. तिने हा प्रवास रात्री केला. या प्रवासासाठी तिने एक सिंपल लूक केला होता. ईशाने ब्लॅक कलरची हुडी परिधान केली होती. ट्रेनमधून प्रवास करताना अनेक लोकांनी तिला ओळखले आणि कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर केले. यानंतर ईशाने आपल्या सर्व चाहत्यांना सोशल मिडियावर मुंबई सेंट्रल आणि वंदे भारत ट्रेन दिसत असणाऱ्याचा एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे.

या प्रवासात लोकांनी तिचा प्रवास सुखाने व्हावा अशा शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र वंदे भारत ट्रेन पकडून ईशा कोणत्या ठिकाणी जात आहे याचा खुलासा तिने केला नाही. तसेच तिने या व्हिडिओला ‘Train ride’ असे कॅप्शन दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.

ईशा देखील अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकली आहे. ईशा अनेक वेळा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचा याच वर्षी फ्रेब्रुवारी महिन्यात घटस्फोट झाला. तिला दोन मुली आहेत. ईशाचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या आयुष्यातील अनेक अपडेट ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT