Dharmendra  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dharmendra : सनी देओलच्या 'जाट' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला धर्मेंद्र यांनी लावले चारचाँद; भांगडा डान्स करत जिंकलं मन, पाहा VIDEO

Dharmendra Dance Video : सनी देओलच्या 'जाट' चित्रपटच्या स्क्रीनिंगला दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी भन्नाट भांगडा डान्स केला आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 'जाट' (Jaat ) चित्रपट आज रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. काल रात्री चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. याला बॉलिवूडचे अनेक कलाकार पाहायला मिळाले होते. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यानचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra ) यांनी भन्नाट भांगडा डान्स केला आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांनी आपल्या लेकाच्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला चारचाँद लावले आहेत. वयाच्या 89व्या वर्षी देखील धर्मेंद्र हे उत्स्फूर्तपणे नाचताना दिसत आहे. धर्मेंद्र जी रेड कार्पेंटवर आल्यावर ढोलताशा वाजू लागला. याच्या तालावर अभिनेते धर्मेंद्र यांनी जागीच उभे राहून मस्त भांगडा केला. त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता. त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. अभिनेते धर्मेंद्र यांनी दिलखुलास डान्स केला आहे.

'जाट' चित्रपट

'जाट' हा ॲक्शन चित्रपट आहे. चित्रपटात सनी देओलसोबत रणदीप हुड्डा देखील दमदार भूमिकेत पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांची चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता शिगेला पोहचली होती. जाट' चित्रपटातील डायलॉगला चाहत्यांकडून खूप पसंती मिळत आहे. "ये ढाई किलो की हात की ताकद पूरा नॉर्थ देख चुका है अब साऊथ देखेगा" हा चित्रपटातील डायलॉग खूप प्रसिद्ध झाला आहे.

'जाट' चित्रपटात मराठी प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमये देखील आहे. 'जाट' चित्रपटाचे दिग्दर्शन गोपीचंद मालीनेनी यांनी केले आहे. चित्रपटात रणदीप हुड्डा 'रणतुंगा' या भूमिकेत दिसतआहे. रणदीप हुड्डा खलनायकाची भूमिका साकारलीआहे. चित्रपटात सनी देओल मुख्य भूमिकेत झळकत आहे. तसेच चित्रपटात विनीत कुमार सिंह, सैयामी खेर आणि रेजिना कैसेंड्रा महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

Hidden Gems Maharashtra : भंडारदऱ्याजवळ पाहा Top 7 ठिकाणं, पावसाळ्यातलंं अद्भूत दृश्य

SCROLL FOR NEXT