Tumbadche Manjula Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tumbadche Manjula: संकटाच्या क्षणी सई ताम्हणकर घालणार देवाला साद; 'तुंबाडची मंजुळा'मधील 'देवा मला पाव की रे' गाणं प्रदर्शित

Tumbadche Manjula: ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटातील ‘देवा मला पाव की रे’ हे भावस्पर्शी गाणं प्रदर्शित झालं असून सई ताम्हणकरवर चित्रित हे गीत प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.

Shruti Vilas Kadam

Tumbadche Manjula: झी स्टुडिओजच्या बहुचर्चित ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी मराठी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता आहे. रहस्य, थरार आणि वेगळ्या कथानकामुळे चर्चेत असलेल्या या चित्रपटातील आता आणखी एक खास गाणं ‘देवा मला पाव की रे’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून भावनिक शब्द आणि सुरेल संगीतामुळे हे गीत थेट प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करत आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकरवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात संकटाच्या क्षणी देवाकडे धाव घेणाऱ्या मनाची आर्त भावना प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. आयुष्यातील वेदना, असहायता आणि भावनिक संघर्ष यामध्ये माणूस श्रद्धेचा आधार शोधतो, हीच भावना या गाण्यातून अनुभवायला मिळते. गाण्यातील प्रत्येक शब्द आणि दृश्य प्रेक्षकांना अंतर्मुख करत असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.

या गाण्याचं आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे गायिका सायली खरे यांनी गीतकार, संगीतकार आणि गायिका अशी तिहेरी जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या आवाजातील भावपूर्ण ठहराव आणि संगीताची संवेदनशील मांडणी यामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे. सायली खरे यांनी सांगितले की, तब्बल १३ वर्षांपूर्वी हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं होतं. त्यावेळी दिग्दर्शक वैभव कोरगावकर यांनी आपल्या पहिल्या चित्रपटात हे गाणं नक्की वापरण्याचं आश्वासन दिलं होतं आणि अखेर ‘तुंबाडची मंजुळा’च्या माध्यमातून ते स्वप्न पूर्ण झालं.

दिग्दर्शक विविध कोरगांवकर यांच्या मते, “‘देवा मला पाव की रे’ हे गाणं चित्रपटातील पात्रांच्या भावविश्वाचा महत्त्वाचा भाग आहे. शब्द संपल्यानंतर मन देवाशी संवाद साधू लागतं, ती भावना आम्ही या गाण्यातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.”

५ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘तुंबाडची मंजुळा’मध्ये जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी यांसारख्या दमदार कलाकारांची फळी झळकणार आहे. रहस्य, विनोद आणि भावनांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी खास ठरणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

SCROLL FOR NEXT