Dev Anand House In Juhu Saam TV
मनोरंजन बातम्या

Dev Anand Bungalow: देव आनंद यांचा 73 वर्षे जुना बंगला विकून 22 मजली इमारत बांधणार?, पण मुलीने चर्चांना दिला पूर्णविराम

Pooja Dange

Dev Anand Bungalow Juhu Banglow Sold:

दिवंगत अभिनेते देव आनंद यांचा जुहू येथील बंगला विकला असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या बंगल्याची देखरेख करण्यासाठी कोणी नसल्याने त्यांचे कुटुंबीय बंगल्या विकत असल्याचे वृत्त समोर आले होते.

देव आनंद यांचा मुलगा सुनील आनंद USला राहतो तर त्यांची मुलगी देविना आई कल्पना कार्तिकसह उटीला राहते. मुंबईतील या बंगल्याची त्यांना देखरेख करता येत नसल्याने त्यांनी हा बंगला विकला अशी चर्चा होत आहे. तर देव आनंद यांच्या नातेवाईकांनी हे वृत्त अफवा असल्याचे सांगितले आहे. तसेच त्यांच्या मुलीने देखील असा काही व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ईटाइम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार देव आनंदच्या भावाचा मुलगा केतन आनंदनी याबाबत खुलासा केला आहे. चित्रपट निर्माते केतन आनंद यांनी देव आनंद यांचा बंगला कोणत्याही रिअल इस्टेट कंपनीने विकत घेतला नसल्याचे सांगितले आहे. तसेच देव आनंदच्या बंगलाच्या जागी कोणताही टॉवर होणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. केतन आनंद म्हणाले की, 'ही बातमी खोटी आहे. मी देविनाला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना याविषयी विचारले आहे.'

हिंदुस्थान टाईम्स यांनी दिलेल्या वृत्तानुसार देव आनंद यांचा जुहू येथील बंगला एका रिअल इस्टेट कंपनीला विकण्यात आला होता. देव आनंद यांच्या बंगल्याचा व्यवहार पूर्ण झाला होता आणि पेपरवर्क सुरू होतं. तसेच देव आनंदचा बंगला ३५०-४०० कोटी रुपयांना विकण्यात आला होता. देव आनंद यांच्या बंगल्याच्या जागी २२ मजली टॉवर उभारण्यात येणार असल्याचे हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तात म्हटले होते. (Celebrity)

अभिनेत्याने जेव्हा जुहूतील ही जागा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांना हा परिसर माहीत नव्हता. देव आनंदने एका मुलाखतीत बंगला बांधण्यासाठी जुहू येथील तिचं जागा का निवडली हे सांगिलते होते.

देव आनंद यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटले होते की, 'मी माझे जुहू येथील घर १९५० साली बांधले. ही जागा ओसाड होती. मला एकटं राहता येईल त्यामुळे मी या जागेच्या प्रेमात पडलो. तेव्हा जुहू हे एक छोटेसे गाव होते. जुहू आता खूप गजबजले आहे. लोकांनी हे गाव भरून गेले आहे. रविवारी आता जुहूचा तो समुद्रकिनारा पाहायला मिळत नाही. आता माझ्या आयरिस पार्क येथील लोकांसाठी गार्डन राहिलेले नाही. आधी फक्त चार बंगले आणि एक शाळाच माझ्या घरासमोर होती.' (Latest Entertainment News)

देव आनंद यांनी त्यांच्या जीवनातील सर्वाधिक काळ या घरात घालविला होता. जवळजवळ ४० वर्षे देव आनंद या घरात राहिले. या बंगल्याला आता ७३ वर्षे झाली आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almond Benefits: बदाम खाण्याची योग्य वेळ कोणती?

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

SCROLL FOR NEXT