Priyanka Chopra Don 3 Entered Saam Tv
मनोरंजन बातम्या

Priyanka Chopra Don 3 Entered: ‘जंगली बिल्ली’ पुन्हा ‘डॉन’चा पाठलाग करणार; रणवीर सिंगसोबत ‘डॉन ३’मध्ये बॉलिवूडच्या देसी गर्लची एन्ट्री?

Don 3 Latest Update: अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘डॉन ३’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Priyanka Chopra Don 3 Entered

गेल्या काही दिवसांपूर्वी फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन ३’ची घोषणा करण्यात आली. चित्रपटाच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर चित्रपटाची जोरदार चर्चा होऊ लागली. शाहरुखच्या ऐवजी चित्रपटामध्ये रणवीर सिंहला घेतल्यामुळे नेटकऱ्यांनी निर्मात्यांसह दिग्दर्शकांना आणि रणवीरला प्रचंड ट्रोल केले. अशातच सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा ‘डॉन ३’मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मीडिया रिपोर्टनुसार, नुकतंच अभिनेत्रीने दिग्दर्शकांसोबत चित्रपटाबद्दल चर्चा केली होती. त्यानंतर आता अभिनेत्रीने चित्रपटामध्ये लीड रोलसाठी ग्रीन सिग्नल दिला असल्याचं बोललं जात आहे, पण अद्याप याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याआधी अनेकदा ‘डॉन ३’साठी कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन यांच्या नावाची चर्चा सुरु होती.

जर प्रियंकाने ‘डॉन ३’ला होकार दिला तर, ती आणि रणवीर चौथ्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करतील. यापूर्वी ‘गुंडे’, ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिल धडकने दो’ या चित्रपटामध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. (Bollywood Actress)

प्रियांका चोप्राने आधी डॉनच्या फ्रेंचायजीमध्ये काम केले आहे. त्यामध्ये तिने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. चित्रपटातला प्रियांकाचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला होता. डॉनमध्ये शाहरुख खान आणि प्रियांका चोप्राचा अभिनय चाहत्यांना फारच आवडला होता. ‘डॉन’ने आणि ‘डॉन २’ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. (Bollywood Film)

फरहानने ‘डॉन’चा पहिला भाग २००६ मध्ये प्रदर्शित केला होता. त्यामध्ये मुख्य भुमिकेत शाहरुख खान, प्रियंका चोप्रा, करीना कपूर आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत होते. तर २०११ मध्ये ‘डॉन २’ तर १२ वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर फरहान चित्रपटाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे. चित्रपटामध्ये, ‘डॉन’च्या भूमिकेत रणवीर दिसणार आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : बेडरूम अन् इंटीमेट सीन; कट म्हटलं तरी हिरोला Kiss करत राहिली प्रसिद्ध अभिनेत्री, नेमकं घडलं काय?

Maharashtra News Live Update: महायुतीकडून भाजपाचे अमर राजुरकर यांना उमेदवारी

OBC आरक्षणात कपात होणार? निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला आदेश, पाहा का घेतला निर्णय?

Vaibhav suryavanshi: 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मालामाल, आलिशान कार आणि मिळाले तब्बल इतके लाख रूपये

Ladki Bahin Yojana : मे महिना संपला; लाडकीच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT