Deool Band 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deool Band 2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून 'देऊळ बंद २' टीमला शाबासकी; जगभरात केली ६० कोटींपेक्षा जास्तची कमाई

Deool Band 2 : ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रपटाच्या टीमची भेट घेत कौतुक केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Shruti Vilas Kadam

Deool Band 2 : ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ हा मराठी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत असून प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वटवृक्ष एंटरटेनमेंट निर्मित आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या लेखन व दिग्दर्शनातून साकारलेल्या या चित्रपटाने ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चित्रपटाच्या या अभूतपूर्व यशानंतर ‘देऊळ बंद २’च्या कलाकार आणि तंत्रज्ञांच्या टीमने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

मुंबई येथे पार पडलेल्या या विशेष भेटीत मुख्यमंत्र्यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन केले. ‘देऊळ बंद २’ला महाराष्ट्रभरातून मिळत असलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. समाजातील विविध घटकांना जोडण्याची आणि त्यांच्या भावनांना स्पर्श करण्याची ताकद या चित्रपटात असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, 'समाजातील सर्व थरांना, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी वर्गापर्यंत सर्वांना एकत्र आणण्याची आणि त्यांच्या भावनांना साद घालण्याची ताकद या चित्रपटात आहे.' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि चित्रपटाच्या पुढील प्रवासाला शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी यावेळी प्रवीण तरडे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, 'महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी ‘देऊळ बंद २’वर भरभरून प्रेम केले आहे. हे यश प्रेक्षकांच्या पाठिंब्यामुळेच शक्य झाले. त्यातच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली कौतुकाची थाप आमच्या संपूर्ण टीमचा आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारी आहे.'

या भेटीदरम्यान ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, निर्माते कैलाश वाणी, अभिनेत्री स्नेहल तरडे, अभिनेते रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, अतुल कुडले, सुनील पालकर, तंत्रज्ञ संकेत धोटकर, छायाचित्रकार प्रशांत मिसळे, जगदीश चव्हाण तसेच पीआर आणि मार्केटिंग क्षेत्रातील कुशल कोंडे व अनुप गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे या चित्रपटाने केवळं १६ दिवसात ६५ कोटींचा व्यवसाय करुन मराठी चित्रपटसृष्टीला घवघवीत यश मिळवून दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपकेंच्या उपस्थितीत जंतरमंतरवर कॉकरोच जनता पक्षाचं आंदोलन सुरू

Gold Silver Price Today : खुशखबर! सलग तीन दिवसात सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Moringa Chutney: वजन कमी करण्यासाठी मोरिंग्याच्या पानाची चटणी कशी बनवाल?

Mumbai : मुंबई हादरली! बेपत्ता कुख्यात गुंडाची हत्या, गटारात आढळला मृतदेह

अभिजीत दिपकेला विमानतळावर का रोखलं? CJPच्या संस्थापकाभोवती अधिकाऱ्यांचा गराडा

SCROLL FOR NEXT