Munawar Faruqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

मुनव्वर फारुकीचा दिल्लीत होणारा शो रद्द; विश्व हिंदू परिषदेने पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र

बंगळुरूनंतर आता मुनव्वर फारुकीचा दिल्लीतील होणारा शो देखील रद्द करण्यात आला आहे.

Shivani Tichkule

Munawar Faruqui Delhi Show Cancel: मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) एक प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आहे. ज्यांचे शो पाहण्यासाठी लोक नेहमीच उत्सुक असतात. गेल्या काही दिवसांपासून तो वादाच्या भोवऱ्यात आहे. धर्म, राजकारणा यासह अनेक मुद्द्यांवर तो मोकळेपणाने बोलत असतो. त्यामुळे या सर्व प्रकारचा त्याच्या शोवर वाईट परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. बंगळुरूनंतर आता मुनव्वर फारुकीचा दिल्लीतील (Delhi) होणारा शो देखील रद्द करण्यात आला आहे.

28 ऑगस्ट 2022 रोजी दिल्लीतील मुनव्वर फारुकीचा शो होणार होता. मात्र, दिल्ली पोलिसांच्या परवाना शाखेने मुनव्वर फारुकीच्या शोसाठी परवानगी देण्यास नकार दिला आहे. विश्व हिंदू परिषदेने दिल्ली पोलिसांना पत्र लिहून मुनव्वरचा शो रद्द करण्याची मागणी केली होती.

हे देखील पहा -

जर हा शो झाला तर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे सदस्य याला विरोध करतील, असे ते म्हणाले होते. हे पत्र विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना लिहिले आहे. मुनव्वर फारुकीचा शो 28 ऑगस्ट रोजी मध्य दिल्लीतील केदारनाथ साहनी सभागृहात होणार होता.

25 ऑगस्ट रोजी विश्व हिंदू परिषदेचे दिल्ली अध्यक्ष सुरेंद्र कुमार गुप्ता यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून फारुकी यांनी आपल्या शोमध्ये हिंदू देवतांची खिल्ली उडवली त्यामुळे भाग्य नगरमध्ये नुकताच जातीय तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मुनव्वर फारुकीचा शो तात्काळ रद्द करा, अन्यथा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते आंदोलन करून शोचा निषेध करतील असा इशारा देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali: तू लग्न कधी करणार? चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता माळीचं मिश्किल उत्तर; म्हणाली, 'तुम्हाला खरंच…'

Maharashtra Live News Update : गाभण गाईचा मृत्यू, भानामती करणी केल्याचा आरोप

म्हातारचळ! ७० वर्षांच्या आजोबाने धावत्या बसमध्ये मुलाचं केलं लैंगिक शोषण, व्हिडिओमध्ये हैवानियत कैद

Shocking: नवरा नपुंसक, शरीरसंबंध नाहीच, पण २० महिने जवळही आला नाही; बायकोनं पोलिसांना सांगितली लग्नानंतरची भलतीच गोष्ट

आयारामांच्या पक्षप्रवेशावरुन संकटमोचकासमोरच भाजप कार्यकर्त्यांचा तुफान राडा, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा|VIDEO

SCROLL FOR NEXT