Deepika- Ranveer Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika- Ranveer: दीपिका-रणबीरचा मोठा निर्णय, बाळासोबत ११९ कोटींच्या नव्या घरात करणार प्रवेश

Deepika- Ranveer New House Entry: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह लवकरच आई- बाबा होणार आहेत. आई झाल्यानंतर दीपिका नवीन घरात करणारं बाळाचं स्वागत असल्याची माहिती समोर आली आहे.

Manasvi Choudhary

बॉलिवूडचे लोकप्रिय कपल अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह लवकरच आई- बाबा होणार आहेत.फेब्रुवारी महिन्यात दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. दरम्यान,आता हे कपल बाळाच्या स्वागताची तयारी करत आहे. आई झाल्यानंतर दीपिका नवीन घरात करणारं बाळाचं स्वागत असल्याची माहिती समोर आली आहे.

पुढील महिन्यात दीपिका पादुकोण बाळाला जन्म देणार आहे. यामुळे दीपिका आणि रणवीर बाळाचं स्वागत नवीन घरात करतील अशी चर्चा सुरू आहे. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणने दोन वर्षाआधी बांद्रा येथे नवीन घर खरेदी केला होतं. नुकतंच या घराचं काम झालं आहे. यामुळे नवीन बाळाच्या स्वागतासाठी दीपिका आणि रणवीर नव्या आलिशान घरात शिफ्ट होणार आहेत.

कुठे आहे दीपिका आणि रणवीरचं नवीन घर

मुंबई बांद्रा बँडस्टँड येथे दीपिका आणि रणवीरचं अलिशान सी फेसिंग अपार्टमेंट आहे. अभिनेता शाहरूख खानच्या मन्नत जवळच आहे. 119 कोटी रूपयांना रणवीर आणि दीपिकाने हा अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. 11,266 स्क्वेअर फूट या फ्लॅटला जोडून 1300 स्क्वेअर फूट टेरेस आहे. दीपिका आणि रणवीरच्या या अलिशान फ्लॅटमध्ये प्रायव्हेट जिम, स्विमिंग पूल आणि एंटरटेन्मेट स्पेस आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

SCROLL FOR NEXT