Deepika Padukone SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone : दीपिका पदुकोणनं रचला इतिहास, AI ला आवाज देणारी पहिली भारतीय

Deepika Padukone AI Assistant Voice : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने इतिहास रचला आहे. ती मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी बनली आहे.

Shreya Maskar

दीपिका पदुकोणला बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखले जाते.

दीपिका मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय सेलिब्रिटी बनली आहे.

जगभरात दीपिका पदुकोणचे भरपूर कौतुक होत आहे.

दीपिका पदुकोणने इतिहास रचला आहे. दीपिका मेटा एआयला आवाज देणारी पहिली भारतीय बनली आहे. मेटा एआय हा मेटाच्या इकोसिस्टममध्ये एकत्र केलेला व्हर्च्युअल असिस्टंट आहे. ज्यामध्ये रे-बॅन मेटा स्मार्ट ग्लासेसचा समावेश आहे. दीपिका पदुकोण आता या एआय असिस्टंटला आवाज देणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीत सामील झाली आहे. ज्यात हॉलिवूड स्टार ऑक्वाफिना आणि जूडी डेंच यांचा समावेश आहे.

बॉलिवूडच्या मस्तानीला मिळालेल्या या यशानंतर तिचे भरपूर कौतुक केले जात आहे. भारतातील वापरकर्ते आता दीपिकाच्या आवाजात मेटा एआयशी बोलू शकतील. तुम्ही भारत, युनायटेड स्टेट्स, कॅनडा, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये इंग्रजीत चॅट करू शकता. कंपनीने हिंदी भाषा आणि यूपीआय लाइट पेमेंट सुरू केलं आहे. ज्यामुळे युजर्सना एक भन्नाट अनुभव मिळणार आहे. दीपिकाचा मधुर आवाज आता भारतात ऐकू येणार आहे. चाहते देखील खूप खुश असल्याचे पाहायला मिळत आहे.

दीपिका पदुकोणचा मेटा एआय मधील सहभागामुळे जागतिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताचे महत्त्व वाढले आहे. मेटाने भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचा आणि भाषिक विविधतेचा सन्मान केला आहे. अभिनय क्षेत्राच्या पलीकडे दीपिकाने आता डिजिटल जगात पाऊल टाकले आहे. तिच्या कारकिर्दीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडचे पावर कपल आहे. दीपिका सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 80.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. दीपिकाचा स्वतःचा 82°E या नावाचा ब्युटी ब्रँड आहे. दीपिकाने 2024 मध्ये बाळाला जन्म दिला. दीपिका आणि रणवीरच्या लेकीचे नाव 'दुवा' आहे. चाहते आता दीपिकाच्या नवीन प्रोजेक्टची वाट पाहत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

kidney Damage : किडनी खराब होण्याआधी नखं देतात संकेत! 'हे' ७ बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT