Deepika-Ranveer Baby SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deepika-Ranveer Baby : चिमुकलीला घेऊन 'दीपवीर' आले घरी, पाहा VIDEO

Deepika Padukone Gets Discharged : बॉलिवूड अभिनेत्री 'दीपिका पदुकोण'ला आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. व्हिडीओ पाहा...

Shreya Maskar

बॉलिवूडची मस्तानी नुकतीच आई झाली आहे. तिने 8 सप्टेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला आहे. खूप वेळा नंतर दीपवीर आई-बाबा झाले आहेत. नुकताच ९ दिवसांनंतर दीपिका (Deepika Padukone) डिस्चार्ज देण्यात आला आहे. दीपिका, रणवीर आणि चिमुकलीसोबत घराकडे रवाना झाली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. तिला आज म्हणजे 15 सप्टेंबर रोजी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज (Deepika Padukone Discharged ) देण्यात आला आहे. दीपवीर मुलीला घेऊन जाताना कॅमेरात कॅप्चर झाले. तेव्हा त्यांच्यासोबत दीपिकाची सासू आणि सासरेही सोबत होते. पापाराझींना हॉस्पिटल बाहेर गाडी जाताना दिसली.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग Ranveer Singh) यांनी सहा वर्षींनी बेबी प्लान केला. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून मुलगी झाल्याची बातमी दिली होती. गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर दीपवीरच्या घरी लक्ष्मी आली. दीपिका-रणवीरने 2018 मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग बॉलिवूडच पॉवर कपल आहे. चाहत्यांना आता त्यांच्या मुलींला पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

दीपिका पदुकोण सोशल मीडिया चांगली सक्रिय असते. तिचे इंस्टाग्रामवर 80.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. आई झाल्यानंतर दीपिकाने आपल्या इंस्टाग्रामवर बायो मध्ये काही बदल केले आहेत. तिने आपल्या बायोत फीड.बर्प.झोप.रिपीट. (Feed.Burp.Sleep.Repeat) असे टाकले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT