Deepika Padukone Saam Tv
मनोरंजन बातम्या

Deepika Padukone: स्पिरिट, कल्किनंतर आता तिसऱ्या चित्रपटातून दीपिकाचा पत्ता कट? निर्मात्यांनी केला मोठा खुलासा

Deepika Padukone: दीपिका पदुकोण गरोदर असल्यामुळे तिला 'राका' (Raka) या चित्रपटातून बाहेर जाण्याची शक्यता आहे, असा तर्क सोशल मीडियावर व्यक्त केला जात आहे. मात्र, या प्रकरणावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपले मौन सोडले आहे.

Shruti Vilas Kadam

Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या बऱ्याच चर्चेत आहे. अलीकडेच, या अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपण लवकरच दुसऱ्या बाळाची आई होणार असल्याची घोषणा केली. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला. मात्र, त्यानंतर लगेचच दीपिका आपल्या गरोदरपणामुळे चित्रपटांतून काही काळासाठी ब्रेक घेणार असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तर दीपिकाने 'राका' (Raaka) या चित्रपटातून बॅकआऊट करत असल्याचे दावे करण्यास सुरुवात केली. आता मात्र, या संपूर्ण प्रकरणावर चित्रपटाच्या निर्मात्यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

दीपिका पदुकोण 'राका' मधून माघार घेणार का?

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे. या बातमीनंतर, तिच्या आगामी 'राका' या चित्रपटाबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहेत. काही बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, गरोदरपणामुळे दीपिकाची भूमिका कमी केली जाईल किंवा तिला चित्रपटातून पूर्णपणे वगळले जाईल. मात्र, चित्रपटाच्या टीमने या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे सांगत फेटाळून लावले आहे. 'द टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या एका निवेदनात टीमने म्हटले आहे की, "सर्व काही नियोजनानुसारच सुरू आहे. 'राका' या चित्रपटात दीपिका पदुकोण अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारत आहे आणि सेटवर अत्यंत सकारात्मक एनर्जीसह चित्रीकरणाचे काम सुरळीतपणे सुरू आहे."

दीपिका पदुकोणच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

माहितीनुसार, "दीपिका सध्या गरोदर असतानाही 'राका' चित्रपटातील काही अत्यंत कठीण आणि ॲक्शन-पॅक्ड सीन शूट करत आहे. चित्रीकरणादरम्यान सुरक्षितता राखली जावी यासाठी दीपिका आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे. 'किंग' (King) आणि 'राका' (Raaka) या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

'राका' या चित्रपटाचे दिग्दर्शन ॲटली यांनी केले असून, 'सन पिक्चर्स'ने त्याची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. दीपिकाने २०२४ मध्ये दुआला जन्म दिला आणि आता ती पुन्हा एकदा गुड न्यूज देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावच्या ST बसचा सूरतमध्ये अपघात, ८ जणांचा मृत्यू; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली सविस्तर माहिती

रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यू

हेड कोच मैदानात उतरवून आखणार प्लॅन; ICC कडून क्रिकेटच्या ५ नियमात मोठे बदल

अबब! मुंबईच्या वरळीत फ्लॅटचं भाडं तब्बल 18 कोटी, VIDEO

कांदा उत्पादक पेटला, महामार्ग रोखला, कांद्याच्या हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर

SCROLL FOR NEXT