Sanya Malhotra New Home Instagram
मनोरंजन बातम्या

Sanya Malhotra New Home: ‘दंगल’ फेम अभिनेत्रीने घेतले नवे आलिशान घर, स्टोरी शेअर करत दिली गुड न्यूज...

सध्या सान्या तिच्या आगामी चित्रपटाबरोबरच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे.

Chetan Bodke

Sanya Malhotra New Home: बॉलिवुडमधील हिट चित्रपटांच्या यादीत ‘दंगल’ चित्रपटाचं नाव आवर्जून घेतले जाते. ‘दंगल’ चित्रपटातील कलाकारांच्या आयुष्यात त्या चित्रपटाने एक वेगळीच कलाटणी देऊन गेला. सान्या मल्होत्राला ‘दंगल’ चित्रपटाने तिला वेगळीच ओळख प्रस्थापित करून दिली. सध्या सान्या तिच्या आगामी चित्रपटाबरोबरच खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आली आहे.

बॉलिवुडची दमदार अभिनेत्री सान्या मल्होत्रा सध्या ‘कटहल’ चित्रपटामुळे बरीच चर्चेत असून सध्या ती त्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सान्याने नुकतेच सोशल मीडियावरून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली असून तिने आपल्या पोस्टमध्ये तिच्या नव्या आलिशान फ्लॅटमधील गृहप्रवेश करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. (Bollywood Film)

Sanya Malhotra New Home

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर स्टोरीवर नव्या घरात गृहप्रवेश करतानाचे काही फोटो शेअर केले आहेत. सोबतच व्हिडीओ देखील शेअर केली आहे. त्याला तिने ‘नवीन घर’ असे कॅप्शन देत फोटो शेअर केले.

या स्टोरीच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना नव्या घराची झलक पाहायला मिळाली आहे. यावेळी अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूड सेलब्रिटींनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सान्याने गृहप्रवेशासाठी ऑफ व्हाइट रंगाची साडी परिधान केली असून तिच्या या पारंपरिक पोशाखाने सर्वांचेच लक्ष वेधले. ‘दंगल’ चित्रपटातील सहकलाकार फातिमा सना शेखने तिच्या पोस्टवर ‘लव्ह’ अशीही कमेंट केली आहे.

Sanya Malhotra New Home

सान्याच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे तर, सध्या तिच्याकडे अनेक प्रभावी चित्रपटांची रांग लागली आहे. हर्मन बावेजा, मेघना गुलजार, विकी कौशलसोबत ती आगामी चित्रपटांमध्ये काम करणार आहे. सान्याने आयुषमान खुरानासोबत काम केलेल्या ‘बधाई हो’ चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: पेट्रोल 45 रूपये लिटर होणार? सरकार पेट्रोलचे दर कमी करणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : ए डुबे देख; संजय राऊतांची भाजप खासदार निशिकांत दुबेंवर टीका

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणात महत्त्वाचा खुलासा, पाकिस्तानवरुन वाहून आलेली संशयित वस्तू...

Kitchen Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार रात्री किचनमध्ये खरकटी भांडी का ठेवू नयेत?

Rasgulla Recipe: मऊसूत आणि टेस्टी रसगुल्ला घरच्या घरी बनवा फक्त ३० मिनिटांत

SCROLL FOR NEXT