Hardik Pandya Saam Tv
मनोरंजन बातम्या

Hardik Pandya: हार्दिकचा मिस्ट्री गर्लसोबतचा क्लोज फोटो पाहिला अन् नताशाला रहावलंच नाही, म्हणाली....

Hardik Pandya Spotted With Mystery Girl: क्रिकेटर हार्दिक पांड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत तो एका मुलीसोबत दिसत आहे. या फोटोवरच आता हार्दिकची पत्नी नताशाने मौन सोडले आहे.

Rutuja Kadam

बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टॅनकोविक आणि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांच्या नात्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हार्दिक आणि त्याची पत्नी नताशा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून काही मतभेद आहेत, असं बोललं जात आहे. याविषयी या जोडप्याने अधिकृतरित्या अद्याप भाष्य केलेलं नाही. मात्र, सोशल मीडियावर याचीच चर्चा सुरु आहे. त्यातच हार्दिक पांड्या आणि एका मिस्ट्री गर्लचा फोटो समोर आल्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

नताशा आणि हार्दिक दोघेही जवळपास सहा महिने एकत्र नाहीत. त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे त्यांच्या वैक्तिक आयुष्याबद्दल सातत्याने सोशल मीडिया आणि माध्यमांतून बोललं जात आहे. दोघांमध्ये नेमका दुरावा आहे की ते कपल सोबत आहे? याविषयी चाहत्यांनासुद्धा जाणून घ्यायचे आहे. नताशा काही दिवसांपूर्वी कॅफेमध्ये एका मित्रासोबत दिसल्यानंतर या चर्चांना आणखीच बळ मिळाले. मात्र, दोघांनीही याबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.

एकीकडे या चर्चा रंगलेल्या असतानाच दुसरीकडे सोशल मीडियावर एक फोटो आला आणि हार्दिकच्या आयुष्यात नव्या मुलीची एन्ट्री झाल्याचं बोलले गेले. त्यामुळेच आता पुन्हा नताशासोबतच्या घटस्फोटाच्या बातम्यांना उधाण आले आहे. हार्दिकने मिस्ट्री गर्लसोबत हसण्याची पोज दिली तेव्हा नताशाने केलेली एक पोस्टसुद्धा चांगलीच चर्चेत आली आहे. हार्दिकचा मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो समोर आल्यानंतर नताशानेही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हार्दिकचे मिस्ट्री गर्लचे फोटो समोर आल्यानंतर नताशाचादेखील व्हिडिओ समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती गिटार वाजतनाना दिसते आहे. याशिवाय ती तिच्या जिममध्ये आरशासमोर गाणे गातेय. 'प्रत्येक गोष्टीवर प्रेम करा, पण देवाला गमावू नका.' अशा कॅप्शनसह तिने हा व्हिडीओ शेअर केला. त्यामुळे एकीकडे फोटो समोर आलेला असताना दुसरीकडे नताशाच्या या पोस्टमुळे याचा थेट संबंध जोडला जातो आहे. हार्दिकचा मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो समोर आल्यामुळेच नताशा ही पोस्टर केली असवी अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे.

दरम्यान, ज्या मिस्ट्री गर्लसोबत हार्दिक पांड्याचा फोटो व्हायरल झालाय तिचे नाव प्राची सोलंकी आहे. ती हार्दिकची फॅन आहे. तिच्यासाठी ही फॅन मुव्हमेंट ठरल्याने तिने हार्दिकसोबतचा हा फोटो शेअर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधु एकत्र आले, आता तुम्ही रडायला सुरुवात करा; संजय राऊतांचा खोचक टोला|VIDEO

Navi Mumbai Crime : कंपनीतून घरी परतताना तिघांवर हल्ला; दहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Pune To Beed Travel: पुण्याहून बीडपर्यंतचा प्रवास कसा करावा? जाणून घ्या मार्ग, वेळ आणि प्रवासाच्या सोयी

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी निमित्त खास माहिती, चंदनाचा टीका लावल्याचे फायदे

Ex Boyfriend zodiac sign: एक्स बॉयफ्रेंड तुमच्या आयुष्यात पुन्हा डोकावतोय? राशीनुसार जाणून घ्या त्याचा प्लान

SCROLL FOR NEXT