Prakash Raj Gets Trolled Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prakash Raj Gets Trolled: पॅलेस्टाईनची काश्मीरशी तुलना, प्रकाश राज यांचं वादग्रस्त वक्तव्य; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Prakash Raj Viral Video: अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Prakash Raj Gets Trolled:

अभिनेते प्रकाश राज पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पॅलेस्टाईनची तुलना काश्मीरशी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

असं असलं तरी अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची त्यांचीही पहिलीच वेळ नाही आहे. याआधीही त्यांनी असे बरेच वक्तव्य केली आहेत, ज्यावरून नंतर वाद निर्माण झाला होता. यातच आता त्यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले प्रकाश राज?

प्रकाश राज यांची एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल क्लिपमध्ये प्रकाश राज म्हणाले आहेत की, पॅलेस्टाईनमध्ये जे काही चालले आहे, त्याला न्याय म्हणता येईल का? आपल्याला न्याय हवा आहे. प्रकाश राज पुढे म्हणतात, ''तुम्ही बाजू घेऊ शकत नाही, कारण बाजू घेण्याचा कोणताही मुद्दा नाही. तुम्ही फक्त त्यांना त्यांची जमीन द्या. बस इतकंच.''  (Latest Marathi News)

ते म्हणाले, 'ते कसे जिवंत राहतात, हे पाहणं तुमचं काम नाही. आपल्याला मोठा भाऊ व्हायचे आहे. आम्हालाही काश्मीरचा मोठा भाऊ व्हायचे आहे, पण तसे झाले नाही.'' अभिनेत्याचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल करत आहेत.

दरम्यान, यापूर्वीही प्रकाश राज हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. कधी सनातन धर्माबाबत केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे, तर कधी चांद्रयानवर वादग्रस्त विधाने करून ते चर्चेत राहिले आहेत. याशिवाय अनेकवेळा त्यांच्या ट्विटमुळेही वाद निर्माण झाले आहेत. यामुळे त्यांना अनेकवेळा ट्रोलचे टार्गेट व्हावे लागले आहे. यावेळीही पॅलेस्टाईनची काश्मीरशी तुलना केल्याने त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती न्यायालयासमोर एका वकिलाला महिलांकडून मारहाण

Mumbai New Railway Line: मुंबईला मिळणार नवी रेल्वे लाइन; कल्याण-कसारा प्रवास होणार सुसाट; काय आहे प्लान?

Shocking : सरकारच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र गडगे भोंदूबाबासह शिंदेला अटक

Akshaya Tritiya Mango Sheera Recipe: अक्षय्य तृतीयेला नैवेद्यात बनवा मऊसूत 'आंब्याचा शिरा', सोपी आहे रेसिपी

सरकारचं मोठं षडयंत्र हाणून पाडलं; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT