Sunil Grover Instagram/@whosunilgrover
मनोरंजन बातम्या

कॉमेडी किंग सुनील ग्रोव्हरवर मुंबईत हृदयाची शस्त्रक्रिया; डॉक्टर म्हणाले, तब्येतीत सुधारणा...

कॉमेडियन सुनील ग्रोव्हरवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॉमेडियन सुनील ग्रोव्हरवर हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्याचे ऑपरेशन एशियन हार्ट इन्स्टिट्यूट, मुंबई येथे करण्यात आले आहे. प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी सांगितलं की, प्रकृती झपाट्याने सुधारत आहे. (Sunil Grover Heart Surgery)

सुनील ग्रोवरने कॉमेडीच्या दुनियेत कपिल शर्माच्या शोमधून वेगळी ओळख निर्माण केली आहे. अनेक बॉलीवूड चित्रपटांव्यतिरिक्त, त्याने वेब सीरिजमध्येही अनेक भूमिका केल्या आहेत. ही बातमी समजल्यावर त्याचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत.

गेल्या आठवड्यात, त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये तो छोले भटुरे यांच्या दुकानात भटूर तळताना दिसत होता. हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. काही चाहत्यांनी विचारले की तू आता अभिनय सोडला आहेस का?

परंतु ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला कारण सुनील ग्रोव्हर नेहमीच त्याच्या तब्येतीची काळजी घेतो आणि तो पूर्णपणे फिट दिसत होता. गेल्या महिन्यात त्याला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा OTT पुरस्कार मिळाला होता. Zee5 वर आलेल्या सनफ्लॉवर या वेबसीरिजसाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. सध्या त्याने कपिल शर्मासोबत पॅचअप केले असून ही मैत्री करण्यात सलमान खानने महत्त्वाची भूमिका बजावल्याचेही वृत्त होते. तीन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाहून परतताना विमानात आणि त्याआधी बॅकस्टेजवर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर सुनीलने कपिलचा शो सोडला होता.

अलीकडेच कपिल शर्माच्या बायोपिकचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतरही सुनील ग्रोव्हरचे नाव चर्चेत आले कारण सुनीलने कपिलच्या आयुष्यात मोठी भूमिका साकारली आहे. गुत्थीपासून ते डॉक्टर गुलाटीपर्यंतच्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Constable Death Case: पत्नीनं पोलीस नवऱ्याचा घेतला जीव? पोलीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनं पालघरमध्ये खळबळ

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कृषी योजनांचा लाभ मिळवायचाय? ई-केवायसी अन् फार्मर आयडी आहे गरजेचं

Weather Update: सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणार धुव्वाधार पाऊस; १६ राज्यांसाठी पावसाचा अलर्ट

तुमच्या सौंदर्यावर पाकचा क्रिम 'बॉम्ब', आरोग्याला घातक उत्पादनांची महाराष्ट्रात घुसखोरी

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणामागे मोदींचा डाव? डिलिमिटेशनसाठी नेमकं काय घडतंय?

SCROLL FOR NEXT