Mega Blockbuster Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mega Blockbuster : कपिल शर्मा लवकरच नवीन चित्रपटात, 'या' प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत करणार स्क्रीन शेअर

कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा(Kapil Sharma) सध्या त्याच्या लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'च्या पुनरागमनामुळे चर्चेत आहे. यावेळी शोमध्ये नवीन कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. अलीकडेच शोचा प्रोमो रिलीज झाला होता. कॉमेडीशोच्या कमबॅकच्या चर्चेनंतर आता कपिल शर्माने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. आता कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

कपिल शर्माने त्याच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चाहत्यांना ही आंनदाची बातमी दिली आहे. 'मेगा ब्लॉकबस्टर'(Mega Blockbuster) असे चित्रपटाचे नाव असून "माझ्या चाहत्यांसाठी नवीन भेट...आशा आहे की तुम्हाला आवडेल.'' असे कॅप्शन कपिलने लिहिले आहे. कपिल शर्माने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही दिली आहे.

कपिल शर्माने त्याच्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करत आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 'मेगा ब्लॉकबस्टर'चा ट्रेलर ४ सप्टेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपटातून कपिल शर्मा बऱ्याच वर्षांनी रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. यामुळेच कपिल शर्माचे चाहते खूप खूश आहेत. विशेष म्हणजे चित्रपटात कपिल शर्मासोबत साऊथची अभिनेत्री रश्मिका मंदाना(Rashmika Mandanna) देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री रश्मिका मंदानाने चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे.

कपिल शर्माला आता नव्या दमात रूपेरी पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर कॉमेडी किंगच्या चाहत्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, कपिल शर्मा पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह प्रेक्षकांना हसवायला १० सप्टेंबरपासून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची दैना;खरीप पिके जलमय | VIDEO

कृष्णा आंदेकरचा जवळचा शूटर पोलिसांच्या तावडीत; कोमकरच्या हत्येसाठी पुरवली होती पिस्तुल

Mithila Palkar: अभिनेत्री मिथिला पालकरचं समुद्रकिनारी बोल्ड फोटोशूट

Maratha Reservation :...तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, आमच्या लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

एकच नंबर! फक्त ६१ रूपयात १००० चॅनेल, सरकारी कंपनीची भन्नाट ऑफर, वाचा अॅक्टिव्हेशनची प्रोसेस

SCROLL FOR NEXT