sunil pal news saam tv
मनोरंजन बातम्या

'द कपिल शर्मा शो' कृष्णा अभिषेकने सोडल्यानंतर सुनील पाल म्हणाला, 'आता 'बी' ग्रेड चित्रपट...'

कृष्णा अभिषेकने 'द कपिल शर्मा शो' सोडला असल्याने हा 'शो चर्चेत आला आहे. यावरून प्रेक्षकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. कृष्णाच्या या निर्णयावर या कॉमेडियन सुनील पालने प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा लवकरच त्याच्या नव्या टीमसोबत छोट्या पडद्यावर दिसणार आहे. लोकप्रिय 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसवायला सज्ज झाला आहे. 'द कपिल शर्मा शो' च्या नव्या सीझनची प्रेक्षकही आतुरतेने वाट पाहत आहेत. अलीकडेच या 'शो'चा नवीन प्रोमो रीलीज करण्यात आला. दरम्यान, या 'शो'मधील कृष्णा अभिषेकने 'द कपिल शर्मा शो' सोडला असल्याने हा 'शो चर्चेत आला आहे. यावरून प्रेक्षकांकडून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे. कृष्णाच्या या निर्णयावर या कॉमेडियन सुनील पालने प्रतिक्रिया दिली आहे.

हास्याचा नवा डोस घेऊन कपिल शर्मा कॉमेडीचा (Comedy) नवा सीझन घेऊन आला आहे. 'शो'चा धमाकेदार प्रोमो रीलीज करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नव्या सीझनमधील कलाकारांची झलकही 'प्रोमो' मध्ये दिसत आहे. सपनाची भूमिका साकारणारा अभिनेता कृष्णा अभिषेकची उणीव प्रेक्षकांना या नव्या सीझनमध्ये भासणार आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक नसल्यामुळे चाहतेही काहीसे नाराज आहेत.

कॉमेडीयन सुनील पालने एका मुलाखतीत कृष्णा अभिषेकच्या 'कपिल शर्मा शो' सोडण्याबद्दलच्या निर्णयावर मत व्यक्त केले आहे. 'मी ऐकले आहे की कृष्णा अभिषेकने 'द कपिल शर्मा शो' सोडला आहे. तो हे सर्व का करत आहे? मला समजत नाही. 'शो' चांगला चालू आहे, चांगले कामही मिळत आहे. चांगले पैसे मिळत आहेत. 'शो' सोडल्यावर काय करणार? छोट्या मालिका? 'बी'

आणि 'सी' ग्रेडचे चित्रपट इकडे तिकडे?', असा सवाल त्याने कृष्णा अभिषेकला केला आहे. 'द कपिल शर्मा शो'ने नाव, प्रसिद्धी, उत्तम व्यासपीठ दिलं आहे. तरी 'शो' सोडण्याचा निर्णय ? कोणीही 'शो' सोडला तरी कपिल शर्माच्या 'शो'वर काहीच परिणाम होत नाही. 'शो' दिवसेंदिवस पुढे जात आहे. 'शो' लोकप्रियता मिळत आहे. 'शो' सोडणारे काय करणार? तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असंही सुनील पालने म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी कृष्णा अभिषेक 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी सीझनचा भाग नसणार असल्याचे वृत्त आलं होते. याबाबत कृष्णा म्हणाला होता, 'मी यापुढे 'शो'चा भाग नसणार आहे. हे खरं आहे. हा जरा कराराचा विषय आहे'. वढं प्रेक्षक मला मिस करणार आहेत. तेवढंच मी देखील करणार आहे असंही तो म्हणाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा अभिषेकचे निर्मात्यांशी करारावरून वाद झाला आहे. यामुळे त्याने हा 'शो' सोडला आहे. 'द कपिल शर्मा शो'चा नवा सीझन १० सप्टेंबरपासून सुरू होणार असून त्याचे प्रक्षेपण शनिवार-रविवार रात्री ९.३० वाजता होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hemant Dhome: मराठी सक्ती विरोधातील आंदोलनावरून प्रसिद्ध अभिनेता भडकला; परप्रांतीय रिक्षाचालकांना दिला मोठा इशारा

Mansi Naik Dance Video: 'मेरे सपनो के राजा' गाण्यावर मानसी नाईकने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आठव्या वेतन आयोगात मिळणार १० ते १६ लाखांचा एरियर

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट

Vande Bharat Train: मुंबईवरून बंगळुरूला जा सुसाट, वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार; मुंबईतून किती वाजता सुटणार अन् तिकीट किती?

SCROLL FOR NEXT