CM Eknath Shinde announced Makarand Anaspure As Ambassador Saam TV
मनोरंजन बातम्या

ST Bus Ambassador Makarand Anaspure: मकरंद अनासपुरे एसटीचे नवे सदिच्छा राजदूत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

CM Shinde Announced Makarand Anaspure As Ambassador: मकरंद अनासपुरे यांना महाराष्ट्र एसटी महामंडळाचे सदिच्छा राजदूत म्हणून घोषित केले आहे.

Pooja Dange

Makarand Anaspure ST Bus Ambassador: मकरंद अनासपुरे त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. तसेच ते त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. मकरंद अनेक सामाजिक कार्यात पुढे असतात. तसेच सामाजिक विषयांची जनजागृती देखील करत असतात.

मकरंद अनासपुरे यांच्यावर नवीन जबादारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकाने अभिनेते मकरंद अनासपुरे यांना महाराष्ट्र एसटी महामंडळाचे सदिच्छा राजदूत म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे.

एसटी महामंडळाच्या लांबच्या पल्ल्याची इलेक्ट्रिक बस आलेल्या आहेत. पहिल्या टप्यात ठाणे ते स्वारगेट हि सवव चालविण्यात येणार आहे. महाराष्ट्रात लांब पल्ल्याच्या १०० इलेक्ट्रिक बस येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच एसटीचे सदिच्छा राजदूत मकरंद अनासपुरे असणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. इ-शिवनेरी या बसचा आज लोकार्पण सोहळा पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

'सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, अमृतमहोत्सवी वर्षात सदिच्छा दूत ही फार मोठी जबाबदारी माझावर पडली आहे. एसटीचा प्रवास हा कधीही न विसरणारा आहे. कारण ग्रामीण भागात एसटी हीच एक वाहिनी आहे नागरिकांना प्रवासासाठीट', एका चित्रपटाच्या शुटींगवेळीचा अनुभव मकरंद यांनी सांगितला. (Latest Entertainment News)

'ST च्या अनेक योजना आहेत. एसटीला जीजी मदत लागेल त्यांचा कारभार लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिन. मला काही वाटलं तेही सांगेन. माझावर सोपवलेली जबाबदारी पुर्णत्वास नेण्याची मी जबाबदारी पूर्ण करीन हा शब्द देतो आणि आभार मानतो'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pooja Hegde: कांजिवरम साडीत खुललं पूजा हेगडेचं सौंदर्य, फोटो पाहताच मन झालं घायाळ

Maharashtra Live News Update : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थांनकडून मुक्ताईला साडी चोळीचा आहेर भेट

Genelia Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईंचा स्वॅग भारी!

Indian Railway : रेल्वेची आरक्षण यादी ८ तास आधी जाहीर होणार | VIDEO

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या नादाला लागू नको नाहीतर पटकनी काय आहे ते दाखवू-राऊतांचा दुबेंना इशारा

SCROLL FOR NEXT