CID Fame Vaishnavi Dhanraj  Saam Tv
मनोरंजन बातम्या

CID फेम अभिनेत्रीला कुटुंबियाकडून मारहाण, जखमी अवस्थेत केलं मदतीचं आवाहन

CID Fame Vaishnavi Dhanraj : CID फेम अभिनेत्री वैष्णवी धनराजच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वैष्णवीच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. व्हिडीओमध्ये वैष्णवी तिच्या मदतीसाठी आवाहन करत आहे.

Manasvi Choudhary

CID Fame Vaishnavi Dhanraj Viral Video:

CID फेम अभिनेत्री वैष्णवी धनराजच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वैष्णवीच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमांच्या खुणा दिसत आहेत. व्हिडीओमध्ये वैष्णवी तिच्या मदतीसाठी आवाहन करत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

घरगुती हिंसाचाराला सामोरे गेलेल्या वैष्णवीने तिच्या कुटुंबियावर मारहाणीचा आरोप केला आहे. वैष्णवीने पोलिस ठाण्यात कुटुंबियांविरोधात शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

वैष्णवीचा हा व्हिडीओ सोशल मीडिया यूजर हिमांशू शुक्लाने एक्सवर पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये वैष्णवी भावूक झालेली दिसतेय तसेच तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झालेल्या दिसत आहेत.

वैष्णवीने, 'नमस्कार, मी वैष्णवी धनराज आहे. मला आता खरोखर तुमच्या मदतीची गरज आहे. सध्या मी काशिमीरा (मीरारोड) पोलीस ठाण्यात आली असून माझ्या घरच्यांनी मला मारहाण केली आहे. कृपया मला तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. असे तिने म्हटले आहे.'

वैष्णवी धनराजने २०१२ मध्ये नितीन शेरावतशी लग्न केलं. मात्र आता या दोघांचा घटस्फोट झाला असल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

वैष्णवी धनराज प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे. वैष्णवीने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. मधुबाला- एक इश्क एक जुनून, बेपन्ना, तेरे इश्क में घायाल, नवरंगी रे, आपकी नजरों ने समझा तसेच CID शोमध्ये तिने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT