Dinesh Phadnis Hospitalized Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dinesh Phadnis Hospitalized: CID फेम अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज, हार्ट अटॅक आल्यामुळे फ्रेडरिक्स रुग्णालयामध्ये दाखल

Dinesh Phadnis Latest News: आपल्या विनोदबुद्धीने सर्वांचे निखळ मनोरंजन करणारा CID फेम फ्रेडरिक्स मुंबईतील रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.

Chetan Bodke

Dinesh Phadnis Hospitalized

सीआयडी (CID) फेम फ्रेडरिक्स पात्र साकारणारा अभिनेता दिनेश फडनीस यांच्या प्रकृतीबद्दल महत्वाची माहिती समोर येतेय. मालिकेमध्ये, आपल्या विनोदबुद्धीने सर्वांचे निखळ मनोरंजन करणारा हा अभिनेता सध्या मुंबईतील रुग्णालयामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. दिनेश फडनीस यांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांना मुंबईच्या तुंगा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दिनेश फडणीस सध्या व्हेंटिलेटरवर असून त्यांच्या प्रकृतीसाठी परिवारासह चाहते प्रार्थना करीत आहेत. (Actor)

सध्या दिनेश यांची प्रकृती चिंताजनक असून सध्या ते मृत्यूशी झुंज देत आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार दिनेश यांना व्हेंटिलेटरवर दाखल करण्यात आले आहे. कालपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये काही प्रमाणात तरी का होईना सुधारणा होत आहे. रिपोर्ट्सनुसार, सीआयडीतली स्टारकास्ट आणि क्रूने काल त्यांच्या तब्येतीची विचारपुस केली होती. त्यांची भेट घेण्यासाठी काही सेलिब्रिटी मंडळींनीही भेट दिली होती. अभिनेत्याची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी यासाठी चाहते, सेलिब्रिटी आणि कुटुंबिय प्रार्थना करत आहेत. (Bollywood)

५७ वर्षीय दिनेश यांनी CID मध्ये फ्रेडरिक्स नावाची भूमिका साकारली आहे. त्यांचं हे पात्र थोडं विनोदी धाटणीतलं पात्र आहे. १९९८ ते २०१८ पर्यंत त्यांनी शोमध्ये काम केले आहे. त्यासोबतच ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतही त्यांनी काही कॅमियो रोल साकारले. 'सरफरोश', 'मेला' सह अन्य चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Congress Protest Live Update : काँग्रेसच्या आंदोलनावर किरेन रिजिजू यांची टीका; म्हणाले, ‘काँग्रेस दिशाहीन’

Red Saree Designs For Women: महिलांसाठी लाल साड्यांच्या सुंदर डिझाईन्स, 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

Maharashtra News Live Update: MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई! आणखी एका आरोपीला अटक; आतापर्यंत १२ जणांना अटक

Hotel Safety Tips: हॉटेलमध्ये चेक-इन केल्यावर काय काय तपासून घ्यावे? 5 महत्वाच्या गोष्टी

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप; काँग्रेसच्या आंदोलनावरही घेतली शंका

SCROLL FOR NEXT