CID and Aahat producer BP Singh passes away saam tv
मनोरंजन बातम्या

प्रसिद्ध दिग्दर्शकाचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन; टेलिव्हिजन क्षेत्रात शोककळा

Veteran TV Producer and Director BP Singh Dies: 'सीआयडी' मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक बी. पी. सिंग यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. निधनाची वर्ता येताच सोशल मीडियावर चाहत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

Bharat Jadhav

  • चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी सोशल मीडियाद्वारे बीपी सिंग यांच्या निधनाची माहिती दिली.

  • त्यांच्या निधनानंतर भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.

  • सीआयडी मालिकेचे निर्माते बी. पी. सिंग यांना कलाकारांची श्रद्धांजली

'सीआयडी' (CID) आणि 'आहट' (Aahat) सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांचे निर्माते आणि दिग्दर्शक बी. पी. सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय टेलिव्हिजन क्षेत्रावर शोककळा पसरलीय. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी बीपी सिंग यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे दिलीय. हृदयविकाराच्या झटक्यानं बी. पी सिंग यांचे निधन झाल्याची माहिती त्यांनी दिलीय. बी.पी.सिंगच्या निधनानंतर टीव्ही तारक-तारकांनी शोक व्यक्त केलंय.

चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून बी.पी. सिंग यांच्या निधनाची बातमी दिलीय. बी.पी. सिंग यांचा एक फोटो शेअर करत, अशोक पंडित यांनी कॅप्शनमध्ये त्यांच्या निधन झाल्याचं सांगितलंय. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक बी.पी. सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झालंय.

आज पहाटे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. ते एक अत्यंत प्रतिभावान चित्रपट निर्माते होते, ज्यांनी आपल्या 'सीआयडी' (CID) आणि 'आहट' (Aahat) सारख्या क्राईम शोच्या माध्यमातून ते परिचित झाले होते.

त्यांचे काम आजही पुढच्या पिढीसाठी एक प्रेरणा आहे. जेव्हा ते IFTDAचे अध्यक्ष होते, त्यावेळी मी त्यांचा सहकारी होतो. ते एक चांगले व्यक्ती आणि प्रेमळ मित्र होते. मनोरंजन क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ते सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि प्रियजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, अशी अशोक पंडित यांनी पोस्ट केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali 2026 : ८ की ९ नोव्हेंबर, यंदा दिवाळी नेमकी कधी? संभ्रम दूर करा आणि जाणून घ्या लक्ष्मीपूजेचा शुभ मुहूर्त

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये लाल मिरचीचा ठसका वाढला; भाव ९ हजारांपार, शेतकऱ्यांना किती दर मिळतोय?

भाजपला जोरदार धक्का! माजी खासदार विरोधकांच्या पक्षात दाखल; मुलगी अन् शेकडो कार्यकर्त्यांसह सोडलं 'कमळ'

Kitchen Hacks : जळालेली भांडी घासून हात दुखतात? हे सोपे उपाय करून भांडी चमकवा सेकंदात

Wednesday Horoscope: अचानक हाती येणार भरपूर पैसा; 2 राशींना सुवर्णसंधी, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT