Ananya Panday-Aditya Roy Kapur News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ananya Panday-Aditya Roy Kapur News: लेक अनन्या आणि आदित्य रॉय कपूरच्या डेटिंगवर वडील चंकी पांडेंनी केलं महत्वाचं वक्तव्य, म्हणाले...

Chunky Pandey Reacts On Ananya Pandey’s Dating Rumours : आता स्वतः चंकी पांडेनी लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Chunky Pandey On Ananya Pandey-Aditya Roy Kapur Dating : गेल्या काही दिवसांपासून अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर कमालीचे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वा परदेशातील या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरुन नेटकऱ्यांनी त्यांचे अफेअर असल्याचा अंदाज बांधला होते. आता स्वतः चंकी पांडेनी लेकीच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडले आहे.

अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.गेल्या वर्षी दिवाळी पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाल्यापासून त्यांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आले होते. नुकतेच हे दोघे परदेशात एकत्र फिरायला गेले होते. तेथील त्या दोघांचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. हे दोघे डेट करत असल्याच्या चर्चांवर चंकी पांडेनी वक्तव्य केले आहे.

चंकी पांडे लेक अनन्याच्या डेटिंगच्या म्हणाले, 'जेव्हा तूम्ही या ग्लॅमर इंडस्ट्रीतीत असता तेव्हा या अशा गोष्टी घडत असतात. या डेटिंगच्या किंवा अफेअरच्या बातम्या पसरण्याची शक्यता जास्त असते. या चर्चांना कोणीही रोखू शकत नाही'.

ऑन स्क्रीन अनन्या पांडेसोबत कोणता अभिनेता चांगला दिसतो असे विचारले असता चंकी पांडे म्हणाले,' 'पती पत्नी और वो' या चित्रपटात अनन्या कार्तिक आर्यनसोबत चांगली दिसत होती'.

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, अनन्याचा 'ड्रिम गर्ल २' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अनन्या आयुष्मान खुरानासोबत झळकणार आहे. आदित्य रॉय कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, आदित्य अनुराग बसूच्या 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आदित्य सारा अली खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT