Prabhu Deva Saam tv
मनोरंजन बातम्या

Prabhu Deva: ५० वर्षीय प्रभूदेवा झाला चौथ्यांदा बाप; दुसऱ्या पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

Prabhu deva Become Father: बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरियोग्राफर प्रभूदेवाच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. प्रभूदेवा लवकरच चौथ्या मुलीचा वडील होणार आहे.

Vishal Gangurde

Prabhu deva Become Father: बॉलीवूडचा प्रसिद्ध कोरियोग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभूदेवाच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज आहे. प्रभूदेवा चौथ्यांंदा वडील झाला आहे. प्रभूदेवाची दुसरी पत्नी हिमानीने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. या वृत्ताला प्रभूदेवाने एका मुलाखतीत याबद्दल माहिती दिली आहे. (Latest Marathi News)

प्रभूदेवाने (Prabhudeva) एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बाप झाल्याचा आनंद व्यक्त केला होता. प्रभूदेवा म्हणाला होता, 'खरं आहे की, मी ५० व्या वर्षी पुन्हा बाप झालो. बाप झाल्याचा खूप आनंद झाला आहे. या सर्वांमध्ये मला मुलगी झाल्याचा आनंद झाला आहे'.

कुटुंबासोबत वेळ घालवणार

प्रभूदेवा पुढे म्हटला की, 'मी कामाचं ओझं कमी केलं आहे. कामामुळे सर्व वेळ इकडे तिकडे पळण्यात जात आहे. आता सर्व कमी झालं आहे. या धावपळीपासून दूर राहून कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे'.

प्रभूदेवा झाला चौथ्यांदा बाप

प्रभूदेवाच्या पहिल्या पत्नीला तीन मुली आहेत. आता पुन्हा घरात चौथी मुलगी येणार असल्याने प्रभूदेवा आनंदीत आहे. यामुळे प्रभूदेवा जास्तीत जास्त वेळ मुलीला देणार आहे. त्यामुळे प्रभूदेवा त्याचा वेळ आता कुटुंबाला देणार आहे.

२०२० साली केलं होतं दुसरं लग्न

वृत्तानुसार, प्रभूदेवाने हिमानीसोबत २०२० साली गुपचूप लग्न केलं होतं. हिमानी सिंह ही पेशाने डॉक्टर असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रभूदेवाचं पहिलं लग्न १९९५ साली रामलताशी केलं होतं. रामलता शास्त्रीय नृत्यांगना होती. लग्नाच्या १६ वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डिझेलसाठी शेतकऱ्याला पाया पडण्याची वेळ; VIDEO व्हायरल

Chanakya Niti: एकटं राहूनही खुश असतात हे लोक, चाणक्यांनी सांगितली ५ कारणं

Maharashtra News Live Update: लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं

प्रवाशांच्या जीवाशी खेळ! इडलीसाठी वापरलं शौचालयाचं पाणी|VIDEO

Gadchiroli : फ्लॅटमध्ये भलताच कारभार सुरू; पोलिसांना कुणकुण, दोन इंजिनिअर भावांना अटक, नागपूर कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT