Ganesh Acharya  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ganesh Acharya : 'पिंटू की पप्पी' चित्रपटात गणेश आचार्य साकारणार अनोखी भूमिका, अनुभवता येणार कॉमेडीचा धमाका

Pintu Ki Pappi : 'पिंटू की पप्पी' चित्रपटात कोरियोग्राफर गणेश आचार्य एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा कॉमेडी चित्रपट आहे. 'पिंटू की पप्पी' चित्रपटाची रिलीज डेट जाणून घेऊयात.

Shreya Maskar

कोरियोग्राफर गणेश आचार्य (Ganesh Acharya) यांचे डान्सच्या दुनियेत मोठे नाव आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये आपल्या डान्स शैलीने जादू केली आहे. त्यांच्या डान्सचे लाखो दिवाने आहेत. तरुणांमध्ये तर त्यांच्या डान्सची क्रेझ पाहायला मिळते. कोरियोग्राफर गणेश आचार्य डान्ससोबत उत्तम अभिनय देखील करतात. छोट्या भूमिकांमधून त्यांच्या अभिनयाची झलक पाहायला मिळते. मात्र आता ते एक मोठ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिनेसृष्टीत सध्या कॉमेडी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच आता आणखी एक कॉमेडी चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज होत आहे. 'पिंटू की पप्पी' (Pintu Ki Pappi ) असे या चित्रपटाचे नाव आहे. चित्रपटाच्या नावामुळे चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी उत्सुकता लागली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ट्रेलरबरोबरच या चित्रपटातील गाण्यांनी रसिकांच्या मनावर राज्य केले आहे. चित्रपटात कोरियोग्राफर गणेश आचार्य कॉमेडी अंदाज पाहायला मिळणार आहे.

सध्या 'पिंटू की पप्पी' चित्रपटाचे धमाकेदार प्रमोशन सुरू आहे. सुप्रसिद्ध कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'पिंटू की पप्पी' हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 'V2S प्रॉडक्शन आणि एंटरटेनमेंट'च्या या चित्रपटाला विधी आचार्य यांची निर्मिती आहे. 'पिंटू की पप्पी' चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक म्हणून शिव हरे यांनी बाजू सांभाळली आहे.

'पिंटू की पप्पी' चित्रपटामध्ये गणेश आचार्य यांच्यासह विजय राज, मुरली शर्मा, सुनील पाल, अली असगर, पूजा बॅनर्जी, अदिती संवाल, रिया एस सोनी, उर्वशी चौहान, प्यूमोरी मेहता दास, मुक्तेश्वर ओझा अशा दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. शिव हरे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'पिंटू की पप्पी' हा चित्रपट सिनेसृष्टीत एक हास्याची उमेद घेऊन येणार आहे. 'पिंटू की पप्पी' चित्रपट येत्या 21 मार्च प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT