Deepika Exit From Rang Maza Vegla  Instagram @spruha_dali_official
मनोरंजन बातम्या

'Rang Maza Vegla'मधील क्युट दीपिकाची मालिकेतून एक्झिट; पोस्ट शेअर करत सांगितले कारण

दीपिका म्हणजे स्पृहा दळी आणि कार्तिकी म्हणजे मैत्रेयी दाते यांनी मालिकेतून घेतला निरोप.

Pooja Dange

Child Actress Deepika's Exit From Rang Maza Vegla: 'रंग माझा वेगळा' ही टीव्ही जगतातील एक सुप्रसिद्ध मालिका आहे. या मालिकेतील कलाकार आणि बाल कलाकार यांची सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोविंग आहे. सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यात या मालिकेतील बाल कलाकार तर कमी वयात खूप लोकप्रिय झाले आहेत.

दीपिका आणि कार्तिकी या दोघीही मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या आहेत. परंतु आता या दोघींच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. मालिकेची कथा १४ वर्षांनी पुढे गेली आहे. त्यामुळे दीपिका आणि कार्तिकी आता तरुण दिसणार आहेत. त्यामुळे दीपिका म्हणजे स्पृहा दळी आणि कार्तिकी म्हणजे मैत्रेयी दाते यांनी मालिकेतून निरोप घ्यावा लागणार आहे.

आज या दोघींचा शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे. दरम्यान स्पृहा दळी म्हणजे दीपिकाने तिच्या इंस्टाग्राम वर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. तसेच केक कापतानाचा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले आहे, रंग माझा वेगळाच्या सेटवरील शेवटचा दिवस, माझ्या सेटवरील आवडत्या कुटुंबासोबत केक कापताना.'

तर आणखी एक पोस्ट करत स्पृहाने तिच्या दीपिका या व्यक्तिरेखेतील विविध फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंना तिने एक सुंदर भलं मोठं कॅप्शन देखील दिलं आहे. तिच्या या पोस्टवर मालिकेतील कलाकारांनी कमेंट देखील केल्या आहेत.

स्पृहाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आज मी तुमच्या लाडक्या दीपिका ह्या व्यक्तिरेखेतून @star_pravah चॅनलवर आपणा सर्वांना दिसणार आहे. "रंग माझा वेगळा" @rangmazaveglaofficial ही माझी पहिली मालिके, खरं तर माझे या इंडस्ट्री मधले पहिले पाऊल.

मला आजही आठवते अतुल सर व अपर्णा मॅडम माझे प्रोड्युसर, माझे डायरेक्टर्स चंदू सर आणि स्वप्नील सर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, त्यांनी माझ्याकडून तुमची लाडकी दीपिका व्यक्तिरेखा घडवून घेतली आणि तिच्यावर तुम्ही भरभरून प्रेम केले , पाहता पाहता माझे ४७२ एपिसोड झाले आणि हो अशाप्रकारे माझी या इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री झाली आणि तो क्षण आलाच माझ्या घरी @star ची परी देखील आली...... माझा पहिला अवॉर्ड "सर्वोत्कृष्ट बाल कलाकार २०२२" व माझा दुसरा अवॉर्ड " सर्वोत्कृष्ट मुलगी २०२३" !!

" रंग माझा वेगळा " या मालिकेने मला खूप मोठी ओळख मिळवून दिली त्याबद्दल माझे सर्व सहकलाकार ज्यांनी मला खूप शिकवले लाला आजोबा , ग्रँड मा हर्षदा ताई, राधा आई पूर्णिमा माऊ, डॅडा आशु दादा, आई रेशमा माऊ, अनघा माऊ, विदीशा माऊ, आदी कॅक्स, माझी बहिण मैत्रेयी, मानसी माऊ, अश्विनी माऊ, कमला माऊ मयुरी मोहिते व इतर.

तसेच मला सिनसाठी तयार करणारे माझे सगळे ताई आणि दादा (makeup and Hair Artist ), माझी काळजी घेणारे माझे स्पॉट दादा आणि मला सिनसाठी मदत करणारी माझी सगळी डिरेक्शन टीम, प्रशांत दादा व वैभव दादा...... रंग माझा वेगळा @rangmazavegalaofficial या सिरीयलची संपूर्ण टीम, माझे प्रोड्युसर @rightclickmidiasolution @shashisumeetproduction आणि चॅनेल @star_pravah @nandini mam, @statishrajwade sir , @monika ताई , @shama ताई या सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल खूप खूप आभार 🙏

Last but not least @neha माऊ जिने माझ्या वर खूप खूप प्रेम केले love u.... तसेच माझे संपूर्ण कुटुंब ज्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले आणि खूप खूप आशीर्वाद दिले व तुम्ही सर्व रसिक प्रेक्षक......तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ !!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सी.पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपती पदाची शपथ

Tanya Mittal Amaal Mallik: अमल मलिक आणि तान्या मित्तलच्या नात्याला सुरुवात; बिग बॉसमध्ये खुलणार नवी प्रेमकथा

Gadchiroli : ब्रिटिश काळापासूनची समस्या आजही कायम; नदीवर पूल नसल्याने करावा लागतोय जीवघेणा प्रवास

पितृपक्षात सोनं महागलं की स्वस्त झालं? वाचा २४ कॅरेट १० तोळं सोन्याचा दर

kumbha Rashi : हितशत्रूंशी सामना, पण धनलाभाचेही योग! कसा असेल कुंभ राशीचा शुक्रवार?

SCROLL FOR NEXT