Saisha Bhoir replace in a Marathi Serial  Instagram @saisha_bhoir_official
मनोरंजन बातम्या

Saisha Bhoir Get Replace : आई - वडिलांमुळे साईशा भोईरचे करियर धोक्यात ? मालिकेतून झाली रिप्लेस

Saisha Bhoir : साईशा भोईर झी मराठीवरील नवा गाडी नवा राज्य या मलिकते बालकलाकार म्हणून काम करत होती.

Pooja Dange

Child Actress Saisha Bhoir Replaced From Serial : बालकलाकार साईशा भोईर आणि तिचे पालक अडचणीत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून साईशा अनेक संकटांना तोंड देत आहे. त्यात आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. साईशा ज्या मालिकेत काम करत आहे. त्या मालिकेतून तिला काढण्यात आले आहे.

साईशा भोईर झी मराठीवरील नवा गाडी नवा राज्य या मलिकते बालकलाकार म्हणून काम करत होती. परंतु तिला या मालिकेतून काढण्यात आलं आहे. तिच्या जागी आरोही सांबरे साईशा साकारत असणारी चिंगीची भूमिका साकारत आहे.

आरोही सांबरे ही मुलगी झाली हो या मालिकेत दिसली होती. ही मालिका स्टार प्रवाहवर प्रवाहित होत होती. झी मराठीने एक प्रोमो सहारे केला असून या प्रोमोमध्ये साईशाच्या जागी आरोही दिसत आहे. (Latest Entertainment News)

का झाली साईशा मालिकेपासून दूर

साईशाच्या आईने काही दिवसांपूर्वी काहीजणांना करोडोंचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी लवकरच साईशाचा पोलिस तपास केला जाणार आहे. साईशाची आई पूजावर काही दिवसांपूर्वी एका जोडप्याला तब्बल १६ लाखांचा गंडा घातल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तिला अटकही करण्यात आली. त्यांनतर पंकज जाधव या २५ वर्षीय व्यक्तीने देखील साईशाच्या आईने पैशांसाठी फसवणुक केल्याचा आरोप केला होता.

पूजा भोईर आणि विशांत भोईर यांची मालमत्ता जप्त करण्याच्या तयारी पोलिस करत असल्याची बातमी समोर आली होती.

'टाइम्स ऑफ इंडिया'ने याबाबत वृत्त दिले आहे. त्यानुसार, साईशाच्या आईकडे खुप पैसे आणि दागिनेही सापडले आहेत.

तिच्या डिमॅट खात्यात 3 कोटी 33 लाख रुपये आहेत. मुंबईत एक आलिशान फ्लॅट, कार तसेच 27 लाखांचे सोन्याचे दागिने देखील आहेत. त्यातच आता या जोडप्यांची बँक खाती, कार आणि साईशाचे काही बॅक खाते, त्यातील पैसे यासर्व मालमत्तेचा तपास आता सुरू झाला आहे.

आता या मालमत्तेची चौकशी करुन त्या लवकरच जप्त केल्या जाणार असल्यात बोलल जात आहे. इतकच नाही तर विशांत व पूजा यांनी साईशासोबत काही आंतरराष्ट्रीय ट्रिपचीही केल्या आहेत ज्याची पोलीस चौकशी करणार आहेत. (Actress)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा, कोल्हापूरातील 'ही' सुंदर ठिकाणं पाहिलीत का?

Tringalwadi Killa : ऐतिहासिक ठिकाणी फिरायला जायचंय? त्रिंगलवाडी किल्ला ठरेल बेस्ट

Karishma Kapoor: ५१ वर्षांच्या करिश्माचा काय आहे स्किन केअर सिक्रेट; जाणून घ्या

Maharashtra Politics : शिंदे गटाला भाजपकडून धक्का! शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी हाती घेतलं 'कमळ'

Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचा हात? शिवराज बांगर यांनी केला धक्कादायक आरोप

SCROLL FOR NEXT