Chhorii 2 Trailer  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhorii 2 Trailer: 'एक घंणा बड़ा राज्य था...'; अंगावर काटा आणणारा 'छोरी २' चा भयानक ट्रेलर प्रदर्शित

Chhorii 2 Trailer Out: अभिनेत्री नुसरत भरुचा पुन्हा एकदा प्रेक्षकांना घाबरवण्यासाठी सज्ज आहे. ४ वर्षांनंतर, नुसरतच्या 'छोरी' या हॉरर चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Shruti Vilas Kadam

Chhorii 2 Trailer: नुसरत भरुचा अभिनीत 'छोरी 2' या भयपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झालेल्या 'छोरी' या चित्रपटाचा दुसरा भाग आहेत. या चित्रपटात नुसरतसोबत अभिनेत्री सोहा अली खान महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. विशाल फुरिया दिग्दर्शित हा चित्रपट येत्या 11 एप्रिल 2025 रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरची सुरुवात एका महिला लहान मुलीला गोष्ट सांगत आहे अशी होते, ती म्हणते, "एक खूप मोठे राज्य होते. त्याचा एक राजा होता. एके दिवशी त्याच्या घरी एका मुलीचा जन्म झाला. त्यामुळे राजाला राग आला." या संवादातून समाजातील मुलींच्या जन्माबद्दल असलेल्या नकारात्मक दृष्टिकोनाचे चित्रण केले आहे. त्यानंतर ट्रेलरमध्ये भयावह दृश्यांची मालिका दिसते, ज्यात सोहा अली खानची एंट्री विशेषतः लक्षवेधी दाखवण्यात आली आहे.

'छोरी 2' मध्ये नुसरत भरुचा आपल्या बाळाला वाचवण्यासाठी संघर्ष करताना दिसते, तर सोहा अली खानचा पात्र अधिक रहस्यमय आणि भयानक वाटत आहे. ट्रेलरमध्ये दाखवलेल्या दृश्यांमुळे चित्रपटाच्या कथानकाबद्दल उत्सुकता वाढली आहे. विशेषतः, विहिरीतील महिलांचे दृश्य प्रेक्षकांच्या मनात भीतीदायक भावना निर्माण करतात.

पहिल्या भागाप्रमाणेच, 'छोरी 2' देखील अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची उत्सुकता वाढली आहे. 11 एप्रिल 2025 रोजी प्रेक्षकांना हा भयपट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला मिळणार? पक्ष बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Sleeping With Earplugs: रोज रात्री इअरप्लग लावून झोपता? आजपासूनच सोडा ही सवय नाहीतर होऊ शकतात हे गंभीर आजार

भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर बनवा कुरकुरीत 'भेंडीची भजी'

Commonwealth Games 2026 : भारताच्या लेकींचा गोल्डन पंच; बॉक्सिंगमध्ये प्रीती पवार, जॅस्मिननं जिंकली सुवर्णपदके

Inflation Alert: सणासुदीपूर्वी सर्वसामान्यांना झटका! डिटर्जंटपासून पेंटपर्यंत 'या' वस्तू होणार महाग

SCROLL FOR NEXT