Chhaava Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chhaava Movie : लाडकींसाठी 'छावा' फ्री; लाडकींसाठी छावा की मतांचा मेवा? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ladki Bahin Chhaava Free : लाडक्या बहिणींसाठी आता आणखी एक खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना छावा चित्रपट मोफत पाहायला मिळणार आहे. मोफत छावा चित्रपटाचं कुणी आयोजन केलंय आणि हा चित्रपट फ्री मध्ये कुठे पाहायला मिळणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Yash Shirke

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Chhaava Free Show : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. छावा चित्रपटाने कमाईचा नवा रेकॉर्ड बनवलाय. त्यापार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास लाडक्या बहीणींना पाहाता यावा, यासाठी अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगतापांनी आठवडाभर मोफत शोचं आयोजन केलंय. एवढंच नाही तर छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणीही आमदार जगतापांनी केलीय.

आतापर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला आहे.. वाचला आहे... मात्र छावा चित्रपटामुळे हा वाचलेला इतिहास प्रत्यक्ष पाहता येणार असल्याचं समाधान लाडक्या बहिणींनी व्यक्त केलंय.

लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं. त्यातच आता अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगतापांनी लाडक्या बहीणींना आठवडाभर मोफत छावा चित्रपटाचं स्क्रीनींग आयोजित केलंय. त्यामुळे आता लाडक्या बहिणींचा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला तारणार का? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gass Cylinder: गॅस सिलिंडरचा तुटवड्यामुळे टेन्शन, इलेक्ट्रिक शेगड्यांची मागणी वाढली; खरेदीसाठी महिलांची गर्दी

BP कमी झालाय? घरीच करा हे ५ उपाय, लगेच मिळेल आराम

Maharashtra Live News Update : सौदी अरेबियातून शेनलॉन्ग जहाज मुंबईत दाखल

टेन्शन संपलं! ३२ देशांनी खजिना उघडला, तब्बल ४०० दशलक्ष बॅरल तेल बाजारात

LPG गॅस सिलिंडर बुकिंगचे नियम पुन्हा बदलले, ग्रामीण अन् शहरी भागासाठी नवी अट

SCROLL FOR NEXT