Chhaava Box Office Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chhaava Box Office Collection : 'छावा' विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट, ३०० कोटींच्या उंबरठ्यावर

Chhaava box office collection Day 9: विकी कौशलच्या 'छावा' चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. विकीच्या करिअरमधील 'छावा' चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला आहे.

Shreya Maskar

विकी कौशलच्या 'छावा' (Chhaava) चित्रपटाची क्रेझ वाढत जात आहे. 'छावा' चित्रपट लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारीला रिलीज झाला आहे. 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता विकी कौशल (vicky kaushal) आणि महाराणी येसूबाईची भूमिकेत रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) पाहायला मिळत आहेत.

'छावा' ' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 9

  • 'छावा' पहिला दिवस 33.1 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 39.3 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 48.5 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 24 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 24.50 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 32 कोटी रुपये

  • सातवा दिवस - 21.5 कोटी रुपये

  • आठवा दिवस- 23 कोटी रुपये

  • नववा दिवस - 45 कोटी रुपये

  • एकूण कलेक्शन - 287.75 कोटी रुपये

विकीच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

आतापर्यंत 'छावा' चित्रपटाने 'पुष्पा 2', जवान, ॲनिमल, पठाण, गदर 2, स्त्री 2,बाहुबली 2 चे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. विकी कौशलने आजवर अनेक हिट चित्रपट केले आहेत. मात्र आजवरच्या करिअरमध्ये उंच भरारी घेणारा हा विकीचा 'छावा' चित्रपट ठरला. 'छावा'मुळे विकीच्या लोकप्रियता वाढली आहे. 'छावा'चित्रपटातील विकीच्या अभिनयाचे चाहते दिवाने झाले आहेत. 'छावा' चित्रपट पुढे ही रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 'छावा' आता लवकरच 300 कोटींचा टप्पा पार करणार आहे.

'छावा' ने अवघ्या सहा दिवसात 200 कोटींचा टप्पा पार केला असून आपले चित्रपटाचे बजेट देखील वसूल केले आहे. 'छावा' चित्रपट तब्बल 130 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. चित्रपटात औरंगजेबाच्या भूमिकेत असलेला अक्षय खन्नाचा अभिनयही चाहत्यांना खूपच आवडला आहे. छावा' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास 5 कोटी कमावले होते. 'छावा' चित्रपटातून दिग्दर्शिक लक्ष्मण उतेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT