Chandrika Dixit Eliminated From Bigg Boss OTT 3 Saam TV
मनोरंजन बातम्या

Vada Pav Girl Eliminated: बिग बॉसच्या घरातून वडापाव गर्ल एलिमिनेट, बाहेर येताच चंद्रिकाने निर्मात्यांवर केले गंभीर आरोप

Chetan Bodke

'बिग बॉस ओटीटी ३'ची सध्या कमालीची चर्चा सुरू आहे. हा शो सुरू होऊन १ महिना झाला असून आतापर्यंत शोमधून चार स्पर्धक एलिमिनेट झाले आहेत. अशातच गेल्या आठवड्यामध्ये पाचवी स्पर्धक एलिमिनेट झाला आहे. दिल्लीची वडा पाव गर्ल म्हणजेच चंद्रिका दीक्षित एलिमिनेट झाली आहे. तिने बिग बॉसच्या घरामधून बाहेर येताच निर्मात्यांवर राग व्यक्त केला आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये पाचव्या आठवड्यामध्ये, वडा पाव गर्ल म्हणजेच चंद्रिका दीक्षित एलिमिनेट झाली आहे. तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर बिग बॉसवर टीकास्त्र सोडले आहे. टीका करताना चंद्रिका दीक्षित म्हणाली, "एकाला बिग बॉसच्या घरात घेता तर एकाला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढता, असं कसं तुम्ही करू शकता ? खरंतर माणसं स्वत:च्या स्वार्थासाठी काय करतील काय नाही, याचा काही नेम नाही. पण मी कधीच कोणाला चुकीचं बोलले नाही. पण तरीही मला बिग बॉसच्या घरातून काढून टाकले."

बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर चंद्रिका दीक्षितने आपला राग व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरातून अनेक स्पर्धक बाहेर पडले आहेत. नीरज गोयत, पायल मलिक, पौलोमी दास, टॅरो कार्ड रिडर मुनिषा खटवानी हे स्पर्धक बिग बॉसच्या घरातून बाहेर आले आहेत. आता त्यानंतर पाचवी स्पर्धक वडा पाव गर्ल चंद्रिका दीक्षित एलिमिनेट झाली आहे. सध्या घरात सना मकबूल, साई केतन राव, अरमान मलिक, शिवानी कुमारी, सना सुलतान, दीपक चौरसिया, विशाल पांडे, लव्ह कटारिया आणि रॅपर नॅजी हे स्पर्धक आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये, 'विकेंड का वार'मध्ये, भोजपूरी अभिनेता रवी किशन यांनी उपस्थिती लावली होती. नुकत्याच झालेल्या 'विकेंड का वार'मध्ये, बिग बॉसने सर्वच स्पर्धकांवर राग व्यक्त केलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरामध्ये, विशाल पांडे आणि अरमान मलिक यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला होता. यानिमित्त विशाल पांडेला सपोर्ट करण्यासाठी त्याच्या आई- वडिलांनी बिग बॉसच्या घरामध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी अरमान मलिकवर बरीच टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरातील बाथरूममध्ये कधीही ठेवू नयेत 'या' गोष्टी, कंगाल होऊ शकता

EPF Calculation : टॅक्स, व्याजदर, TDS, कंपनी आणि तुमचे किती पैसे...; PF बाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं वाचा एका क्लिकवर

Solapur News : 'लाडकी बहीण' कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा

Shaktipeeth : रक्ताचे पाट वाहतील पण भूसंपादन होऊ देणार नाही, शक्तिपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी आक्रमक!

Viral Video: अरेरे, लय वाईट! भांडण सोडवायला गेला; त्यालाच धु धु धुतला, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT