तेलुगू सिनेसृष्टीतून दु:खद बातमी समोर येत आहे. दिग्गज अभिनेते चंद्रमोहन यांची वयाच्या ८२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, हृदयविकारासंबंधित आजारामुळे चंद्रमोहन यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यांच्या परिवाराने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रमोहन यांना हृदयविकारासंबंधित आजारामुळे हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांना सकाळी ९: ४५च्या सुमारास उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचे निधन झाले. चंद्रमोहन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून टॉलिवूड सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली आहे.
सध्या सोशल मीडियावर त्यांचे फॅन्स आणि अनेक सेलिब्रिटी मित्र त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. चंद्रमोहन यांच्या पश्चात पत्नी जालंधरा आणि दोन मुली असा परिवार आहे. अभिनेत्यावर सोमवारी हैदराबादमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
तेलुगू सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते चंद्रमोहन यांना ‘RRR’ फेम ज्युनियर एनटीआरने (Jr NTR ) ट्विट करत चंद्र मोहन यांना श्रद्धांजली वाहिली. “गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारून ओळख निर्माण करणारे चंद्रमोहन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभो...” असे ट्विट ज्युनियर एनटीआरने केले आहे.
चंद्र मोहन यांचा जन्म २३ मे १९४१ रोजी झाला होता. १९६६ मध्ये 'रंगुला रत्नम' या चित्रपटातून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. 'पदहारेला वायासु', 'चंदामामा रावे', 'अथानोक्कडे', '7 जी बृंदावन कॉलोनी', 'मिस्टर' सारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. त्यांनी जवळपास आपल्या सिने कारकिर्दीत एकूण ९३५ चित्रपटांमध्ये काम केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.