Chala Hawa Yevu Dya  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांनो निराश होऊ नका, ब्रेकनंतर शो नव्या जोमात परत येणार; चॅनेलने दिली मोठी अपडेट

Chala Hawa Yevu Dya Last Episode: झी मराठी वाहिनीकडून या कार्यक्रमाला निरोप देण्याआधी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. आम्ही या कार्यक्रमाला निरोप देत आहोत तेही पुन्हा परत येणाच्या वचनासोबत, असे झी मराठी वाहिनीकडून सांगण्यात आले आहे.

Priya More

Chala Hawa Yevu Dya Show:

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या आवडता शो 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yevu Dya Show) सध्या चांगलाच चर्चेत आहे. गेल्या १० वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला खळखळवून हसवणारा 'चाल हवा येऊ द्या' या शोबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या मालिकेमधून अभिनेता निलेश साबळेने एक्झिट घेतल्यामुळे या शोचे प्रेक्षक नाराज झाले होते. पण आता हाच शो प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. झी मराठी वाहिनीकडूनच याबाबत माहिती देण्यात आली आहे.

झी मराठी वाहिनीकडून या कार्यक्रमाला निरोप देण्याआधी पुन्हा एक मोठी अपडेट समोर आली आहे. आम्ही या कार्यक्रमाला निरोप देत आहोत तेही पुन्हा परत येणाच्या वचनासोबत, असे झी मराठी वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम लवकच बंद होणार असल्याचे समजते. असे असले तरी देखील झी मराठी वाहिनीकडून सांगिल्याप्रमाणे आता हा कार्यक्रम पुन्हा भेटीला येणार का हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

'चला हवा येऊ द्या' हा शोचा आज म्हणजे १७ मार्चला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. या शोच्या शेवटच्या भागबद्दल बोलताना झी मराठी वाहिनीने सांगितले की, 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा भाग जरी प्रसारित होणार असला तरी प्रेक्षकांनी निराश होऊ नका. कारण एका अल्पविरामानंतर हा कार्यक्रम तुमच्या त्याच लाडक्या टीमसोबत पुन्हा एकदा हसवायला आणि तुमचं मनोरंजन करायला सज्ज होणार आहे.'

'चला हवा येऊ द्या' या शोबद्दल बोलताना झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर व्ही.आर. हेमा यांनी सांगितले की, 'चला हवा येऊ द्या या शोने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्यावर नेऊन ठेवला आहे. या शोच्या टीम मधल्या प्रत्येकानी लोकांच्या हृदयात आपलं घर निर्माण केले आहे. वाहिनीसोबत असलेलं त्यांचं नातं हे अलौकिक आहे. तुमच्या लाफ्टर डोसचा बुस्टर डोस घेऊन ही टीम तुमच्यासाठी नव्या जोमात परत येणार आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT