Kushal Badrike Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kushal Badrike Video: "हमे तो अपनों ने लूटा..."; अजय देवगणचा इमोशनल डायलॉग केला शेअर, कुशल बद्रिकेला काय झालं?

Kushal Badrikde Video: सोशल मीडियावर कुशल बद्रिकेने एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

अभिनेता कुशल बद्रिके 'चला हवा येऊ द्या ' या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला आहे. विनोदाच्या अचूक टायमिंगने कुशलने प्रेक्षकांची मने जिंकली. सोशल मीडियावर कुशल बद्रिके त्याच्या प्रोजेक्टविषयी माहिती देत असतो. सध्या सोशल मीडियावर कुशल बद्रिकेने एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. जी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

अलिकडेच, सोशल मीडियावर कुशलने चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचे फोटो पोस्ट केले होते. मात्र आता या फोटोंनंतर कुशलने माफी मागितली आहे यामागचं नेमकं कारण काय आहे ते जाणून घेऊया.

कुशलने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅडलवर व्हिडीओ पोस्ट केली आहे. या व्हिडीओमध्ये कुशल आणि दिग्दर्शक विजू माने दिसत आहेत. कुशलने, 'नमस्कार काल मी एक पोस्ट केली होती. पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो सिनेमा मी करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याने सिनेमाचे लेखक, दिग्दर्शक विजू माने असणार होते. पण त्याच्या हातातूनही हा सिनेमा गेला' असे व्हिडीओमध्ये म्हटलंय. शेअर केलेल्या या व्हिडीओला हमें तो अपनो ने लूटा हे गाण बॅकग्राऊंडला वाजताना दिसत आहे.

व्हिडीओ शेअर करत कुशलने 'काल post केलेल्या नवीन सिनेमाच्या announcement बाबत खुलासा. आता मात्र शुभेच्छांची खरी गरज' असं कॅप्शन दिलं आहे. कुशलने काल शुटिंग दरम्यानचे फोटो पोस्ट केले होते ज्यामध्ये दोन मॉडेल बिकनीमध्ये होत्या. कुशलसह अन्य कलाकार मंडळी देखील दिसत होती. फोटो शेअर करत काहीतरी नवीन करतोय शुभेच्छा असू द्या असे म्हटले होते. मात्र आता नुकत्याच केलेल्या या सोशल मीडियावरील व्हिडीओने सेलिब्रिटींसह नेटकऱ्याचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Is waking up at 3 am normal: दररोज पहाटे ३-५ या वेळेत जाग येतेय? सावध व्हा आणि पाहा शरीर तुम्हाला काय संकेत देतंय?

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

Success Story: वडिलांच्या निधनानंतर आयुष्य बदललं! ना कॉलेज, ना कोचिंगशिवाय क्रॅक केल्या १२ सरकारी परीक्षा; IPS संदीप चौधरी यांचा प्रवास

जिमवरून आल्यानंतर काय आणि कधी खाल्लं पाहिजे?

BMC Election : मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंची नवी रणनीती? ठाकरेसेना देणार नव्या चेहऱ्यांना संधी, VIDEO

SCROLL FOR NEXT