Bigg Boss OTT 2 Contestant Wild Card Entry  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 2 Contestant Wild Card Entry: ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये ५ स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एन्ट्री; घरात येताच घातला राडा, प्रोमो आला

Bigg Boss OTT 2 Contestants: आशिका भाटीया आणि एल्विश यादव या स्पर्धकांनंतर वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.

Chetan Bodke

Bigg Boss OTT 2 Updates: ‘बिग बॉस’ हा शो नेहमीच टेलिव्हिजन विश्वात असो किंवा ओटीटी विश्वात या शो ची तुफान चर्चा होते. नुकतंच जियो सिनेमावर ‘बिग बॉस ओटीटी’चा दुसरा सीझन सुरू आहे. सोशल मीडियावर या शोसह त्यातील सर्वच स्पर्धक चर्चेत असून आणखी काही वाईल्ड कार्ड स्पर्धकांची शोमध्ये एन्ट्री झाली. सध्या शोमध्ये काही वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झालेली पाहायला मिळत आहे. आशिका भाटीया आणि एल्विश यादव या स्पर्धकांनंतर आणखी एका व्हिडिओ क्रिएटरची एन्ट्री झाली आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’ मध्ये मराठमोळा व्हिडिओ क्रिएटर दीपराज जाधवची एन्ट्री झाली आहे.

या मराठमोळ्या व्हिडिओ क्रिएटरची एन्ट्री झाली असून सध्या त्याचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ‘बिग बॉस ओटीटी २’च्या टीझरमध्ये दीपराज एन्ट्री करत असल्याचे दिसून येत आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाल्यानंतर बिग बॉसने घरातील सदस्यांना नव्या सदस्यांबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा टास्क दिलेला असतो. दरम्यान,ज्यावेळी दीपराज जाधव बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांसोबत संवाद साधण्यासाठी जातो, त्यावेळी त्याच्यासोबत कोणताच स्पर्धक देत नाही.

‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये आतापर्यंत आशिका भाटीया आणि एल्विश यादव या दोन स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. आता आजच्या भागात तब्बल पाच स्पर्धक एकाच वेळी घरात एन्ट्री घेणार आहेत. वाईल्ड कार्ड स्पर्धकांच्या यादीत दीपराज जाधवसोबत आरजे मलिश्का, मालिनी अग्रवाल, बीसी आंटी उर्फ स्नेहल मेहरा आणि डॅनी पंडित या स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे. आता या ७ वाईल्ड कार्ड स्पर्धक एकत्र येऊन घरात काय खेळी करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘बिग बॉस ओटीटी २’ची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. शो प्रमाणेच शोमधील सर्वच स्पर्धकांची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. सोशल मीडियासह ओटीटीवर प्रेक्षकांचा सर्वाधिक कल या शोला असल्याने या शोचा कालावधी वाढवला आहे. शोची लोकप्रियता प्रेक्षकांमध्ये सर्वाधिक वाढल्याने हे पर्व दोन आठवड्यासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा मागील वीकेंडला होस्ट सलमान खाननं केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT