KK
KK Saam Tv
मनोरंजन बातम्या

केकेच्या मृत्यूचं गूढ वाढलं! डोक्याला अन् चेहऱ्याला जखमा; पोलिसांकडून अनैसर्गिक मृत्यूची नोंद

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आता गायक केके यांच्या चेहऱ्यावर जखमांच्या खुणा आढळल्याने त्यांच्या मृत्यूबाबत सस्पेंस वाढला आहे. गायक केके यांचे मंगळवारी रात्री उशिरा कोलकाता येथे लाईव्ह कॉन्सर्टमध्ये निधन झाले. सुमारे तासभर कार्यक्रम सुरू असतानाच त्यांची प्रकृती खालावली होती. तेथून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गायक केकेच्या कपाळावर आणि ओठांवर जखमांच्या खुणा आढळल्या आहेत, यामुळे पोलिसांनी त्यांच्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. आधी केके यांच्या मृत्यचे कारण हृदयविकाराचा झटका सांगितलं जात होत. पण आता पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केल्याने या प्रकरणासंदर्भात तपास होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलकाता पोलिसांनी केकेच्या मृत्यूबाबत 'अनैसर्गिक मृत्यू'चा गुन्हा दाखल केला आहे. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, केकेंच्या चेहऱ्यावर आणि डोक्याला दुखापत झाल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येईल. याशिवाय हॉटेल कर्मचारी आणि कार्यक्रमाच्या आयोजकांचीही पोलीस चौकशी करणार आहेत. (Death of singer KK)

कोलकाता पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल माहिती दिली की, आज बुधवारी त्यांचे शवविच्छेदन केले जाईल, त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण कळेल. ते लाईव्ह कॉन्सर्ट केल्यानंतर, केके आपल्या हॉटेलवर परतले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटले आणि अचानक बेहोश झाले, अशी माहिती त्यांनी दिली.

त्यानंतर, केके यांना दक्षिण कोलकाता येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे रात्री 10 वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

गायक केके यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे. "ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो योग्य नाही, याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. दिलीप घोष म्हणाले की, एसीशिवाय आणि एवढ्या गर्दीत त्यांना काम करावे लागले. तेथे क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असल्याने तसेच एसी बंद असल्याचे त्यांनी सांगितले. कदाचित यामुळेच त्यांची तब्येत बिघडली की नाही हे माहीत नाही."

केके 53 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. केके यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी दिली. केकेच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये 'यारों', 'तडप तडप के', 'बस एक पल', 'आँखों में तेरी', 'कोई काहे', 'इट्स द टाइम टू डिस्को' इत्यादींचा सुपरहिट गाण्यांचा समावेश आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT