Anand Mahindra Shared Deepika Padukone Video In Oscars 2023
Anand Mahindra Shared Deepika Padukone Video In Oscars 2023 Saam TV
मनोरंजन बातम्या

Oscars 2023: 'नाटु नाटु' हे फक्त गाणे नाही तर.... दीपिकाच्या व्हिडिओवर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केलेलं ट्विट चर्चेत

Pooja Dange

Anand Mahindra Tweet: आज भारतासाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. भारताला एक नाही तर दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले आहेत. The Elephant Whisperers आणि 'नाटु नाटु' गाण्याला ९५ वा अकादमी पुरस्कार प्राप्त झाला आहे.

तर अनेक दिग्गज या दोन्ही विजेत्यांचे अभिनंद करत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील ट्विट करत 'नाटु नाटु'चे कौतुक केले आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर सक्रिय आहेत. त्यांनी 'नाटु नाटु' या गाण्याने ऑस्कर मिळविल्यानंतर ट्विटरवर ट्विट करत राजामौली, कीरावानी आणि चंद्रबोस यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ऊर्जा, आशावाद, पार्टनरशिप, अशक्य विजय. 'नाटु नाटु' हे फक्त एक गाणे नाही: हा एक मिनी- एपिक मूवी आहे. सगळीकडे हे गाणे लोकांना थिरकायला भाग पाडत आहे. ऑस्करमध्येही लोक स्वतःला नाचण्यापासून रोकु शकली नाहीत. एसएस राजामौली, एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांनी नमन.

तुम्हाला त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. या व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोन नाटु नाटु' गाण्याचा परिचय देताना दिसत आहेत. पण जेव्हा दीपिका बोल्ट असताना प्रेक्षक एकच जल्लोष करत आहेत.

ऑस्करच्या मंचावर या गाण्याचे गायक काल भैरव आणि राहुल सिप्लिगंज यांनी गाणे सादर केले. त्यालाही तुफान प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक नाचत, ओरडत गाण्याला त्यांची पसंती दर्शवत होते.

आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी राम चरणकडून या गाण्यातील स्टेप शिकतानाच व्हिडिओ शेर केला होता. तर आनंद महिंद्रा यांनी माझ्यापक्ष लवकर स्टेप शिकले, असे राम चरण याने म्हटले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT