Mathew Perry Saam TV
मनोरंजन बातम्या

Matthew Perry Death : प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, बाथ टबमध्ये आढळला मृतदेह

Hollywood Actor Matthew Perry Death : मॅथ्यू पेरीच्या निधनाने चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

प्रविण वाकचौरे

Hollywood News :

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता मॅथ्यू पेरीचं वयाच्या 54 व्या वर्षी निध झालं आहे. 'फ्रेंड्स' या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये चँडलर बिंगच्या भूमिकेमुळे मॅथ्यू जगभरात प्रसिद्ध झाला होता. मॅथ्यू पेरीच्या निधनाने चित्रपटसृष्टीलाच नव्हे तर त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मॅथ्यू पेरी शनिवारी त्याच्या लॉस एंजेलिस येथील घरात बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळला. सूत्रांच्या हवाल्याने मॅथ्यू पेरीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. बाथ टबमध्ये बुडून मॅथ्यू पेरीचं निधन झाल्याचा अंदाज आहे. (Latest News Update)

मॅथ्यू पेरीने 1990 च्या दशकात प्रसिद्ध अमेरिकन टेलिव्हिजन कॉमेडी सीरिज 'फ्रेंड्स'मध्ये मुख्य भूमिका साकारली. ही कॉमेडी मालिका 1994 ते 2004 अशी 10 वर्ष सुरु होती.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

फ्रेंड्सव्यतिरिक्त मॅथ्यू पेरीने रोम-कॉम, फूल्स रश इन, द होल नाइन यार्ड्ससह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. क्राइम कॉमेडी द होल नाईन यार्ड्समध्ये त्याने ब्रूस विलिसच्या सोबत स्क्रीन शेअर केली. (Entertaiment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepali celebrities: मनीषा कोइरालापासून सुनील थापापर्यंत, या नेपाळी सेलिब्रिटींनी मनोरंजन विश्वातून जिंकली चाहत्यांची मनं

Fever: वारंवार ताप येणे 'हे' कोणत्या आजारांचे लक्षण आहे?

Pune Crime : विसर्जन मिरवणुकीत महिला पत्रकाराचा विनयभंग; पोलिसांकडून मोठी कारवाई, ढोल ताशा पथकातील दोघांना अटक

Police Roles: राणी मुखर्जीपासून अजय देवगणपर्यंत, 'या' कलाकारांनी पडद्यावर साकारली पोलिसांची दमदार भूमिका

Skin Care: वयाच्या चाळीशीतही तरुण दिसायचं, तर घरच्या घरी करुन लावा ही पेस्ट, आठवड्याभरात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT