Ira Khan Proposal Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ira Khan : आमिर खानच्या लाडक्या लेकीला बॉयफ्रेंड केलं हटके प्रपोज; पाहा VIDEO

सोशल मीडियावर अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तिचा बॉयफ्रेंड तिला प्रपोज करताना दिसत आहे.

Shivani Tichkule

Ira Khan Proposal Video: आमिर खानची (Aamir Khan) मुलगी इरा खान नेहमीच चर्चेत असते. इरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. इरा (Ira Khan) आपल्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा आपल्या खाजगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. ती सतत आपल्या बॉयफ्रेंडसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Aamir Khan Duaghter Proposal Video)

इरा 2020 पासून नुपूरला डेट करत आहे. नुपूर हा फिटनेस ट्रेनर आहे. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. नुकतंच इराने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर (Video Viral) केला आहे, ज्यामध्ये तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखर (Nupur Shikhare) तिला हटके अंदाजात प्रपोज करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ एका इव्हेंटचा आहे, जिथे नुपूर लोकांच्या गर्दीसमोर इराला प्रोपोस करत किस करतो. त्यानंतर दोघेही 'हो' म्हणतात. हा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'पोपये - ती हो म्हणाला. इरा- हो मी हो म्हणालो' असे हा खास क्षण शेअर करताना इराने लिहिले आहे. तिच्या चाहत्यांसह अनेक कलाकारांनी देखील या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्स करुन शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आमिर खान आणि रीना दत्ताची मुलगी इरा हिने दिग्दर्शक म्हणून थिएटरमध्ये पदार्पण केले आहे. मात्र, इराचा बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्याचा कोणताही विचार नाही. काही काळापूर्वी इरा आणि नुपूरच्या लग्नाच्या अफवा पसरल्या होत्या, परंतु आतापर्यंत या जोडप्याने त्यांच्या लग्नाबाबद कोणतीही माहिती उघड केलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mantralaya Bribe Case: एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे...; मंत्रालयातील लाचखोरीचं रेट कार्ड व्हायरल

Maharashtra Live News Update : . कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार

Dhule Crime : लग्नसोहळ्यात रक्तरंजित थरार! ८ जणांवर चाकूने सपासप वार, तिघांचा जागीच मृत्यू

Raja Shivaji: हातात भगवा, नजरेत ज्वाला…; शिवजयंतीनिमित्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाची दमदार झलक समोर

Kolhapur News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर अश्लील डान्स|Video Viral

SCROLL FOR NEXT