Bhola Trailer Out
Bhola Trailer Out  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bhola Trailer Out: अजय देवगण पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये; सस्पेंस रोमान्स थ्रिलर 'भोला'चा ट्रेलर प्रदर्शित

Pooja Dange

Action Packed Movie Bhola Trailer Out: अजय देवगणच्या 'दृश्यम २' या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळाला. याच नावाने बनलेल्या दाक्षिणात्य चित्रपट हिंदी चित्रपटपूर्वी प्रदर्शित झाला होता. तरी हिंदी चित्रपटाला मिळालेले यश अभूतपूर्व होते.

अजय देवगण 'दृश्यम 2' नंतर त्याचे चाहते त्याच्या आगामी चित्रपट 'भोला'ची वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या टीझरमधील व्हीएफएक्सने प्रेक्षकांना आधीच प्रभावित केले होते. प्रेक्षक चित्रपटाची वाट पाहत आहेतच, पण चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करून प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 'भोला' चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तयारी सुरू होती. अजय देवगणने गेल्या आठवड्यातच ट्रेलरच्या रिलीजची तारीख जाहीर केली होती. तसेच चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढवत 'भोला'ची टीम चित्रपटाचे नवनवीन मोशन पोस्टर्ससह ट्रेलरच्या अनेक वेळा अपडेट करत होती. आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

दृश्यम 2 नंतर, अजयचा भोला हा देखील दक्षिण चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. भोलाची कथा साऊथच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'कार्ती' घेतली आहे. मूळ चित्रपटात अभिनेता कार्तीने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमी केला होती.

'भोला' चित्रपटाचा ट्रेलर खूपच थरारक आहे. चित्रपटातील प्रत्येक रंजक भाग ट्रेलरमध्ये दाखविण्यात आला आहे. तुम्हाला ट्रेलरमध्ये अॅक्शन, ड्रामा, प्रेम, इमोशन सर्वच पाहायला मिळते. तब्बू आणि अजय देवगण यांच्यावर या चित्रपटामध्ये दमदार भूमिका आहे हे ट्रेलर पाहून लक्षात येते.

भोलाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर, तब्बू पुन्हा एकदा अजय देवगणसोबत या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय दीपक डोबरियाल आणि शरद केळकर यांसारख्या कलाकारांचीही या चित्रपटात समावेश आहे. या चित्रपटात तब्बू पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, तर दीपक डोबरियाल नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

भोलाची कथा ड्रग माफियावर आधारित आहे. या चित्रपटात वडील आणि मुलीचे बॉन्डिंगही पाहायला मिळणार आहे. भोला 30 मार्च 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 3D आणि IMAX या दोन्ही प्रकारात प्रदर्शित होणार आहे.

अभिनयासोबतच अजयने भोळा चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. त्याच्या दिग्दर्शनात बनलेला हा चौथा चित्रपट आहे, याआधी अजयने यू मी और हम, शिवाय, रनवे 34 सारखे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. त्याचबरोबर टी-सिरीज, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि अजय देवगण फिल्म्स यांनी भोलाच्या निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

CSK Vs SRH : ऋतुराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT