Tauba Tauba Song Choreographer Bosco Martis News Instagram
मनोरंजन बातम्या

Tauba Tauba Song : 'तौबा तौबा'साठी विकी कौशलचंच कौतुक का ? गाण्याच्या कोरिओग्राफरला सन्मान न मिळाल्यामुळे व्यक्त केली खदखद

Tauba Tauba Song Choreographer Bosco Martis News : गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातलं 'तौबा तौबा' गाणं रिलीज झालं. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून गाण्याच्या हुकस्टेप्सची आणि विकी कौशलची चांगलीच चर्चा होत आहे.

Chetan Bodke

अभिनेता विकी कौशल आणि तृप्ती डिमरी स्टारर 'बॅड न्यूज' चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि गाण्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटातलं 'तौबा तौबा' गाणं रिलीज झालं. या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत असून गाण्याच्या हुकस्टेप्सची आणि विकी कौशलची चांगलीच चर्चा होत आहे. गाण्याचे सर्वत्र कौतुक होत असताना कोरियोग्राफर यावर नाराज आहेत. विकी कौशलचे का कौतुक करीत आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे.

'तौबा तौबा' गाण्याचे कोरियोग्राफर बॉस्को मार्टिस आहेत. नुकतंच त्यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला. मुलाखतीमध्ये बॉस्को मार्टिस यांनी सांगितले की, "विकीला हा डान्स करणं शक्य झालेलं आहे. कारण, त्याने पूर्वीही काही गाण्यांमध्ये डान्स केलेला आहे. पण, चाहत्यांना त्याच्या या गाण्यातील स्टेप्स आवडल्या आहेत, कारण त्या गाण्याची कोरियोग्राफी खूप उत्तम रित्या झालेली आहे. जिथे पाहू तिथे 'तौबा तौबा' गाण्याचीच चर्चा सुरू आहे. सर्वच लोकं विकीच्या डान्सचे कौतुक करीत आहे."

कोरियोग्राफरने पुढे मुलाखतीत सांगितले की, "विकीचा हा भन्नाट डान्स एका व्यक्ती मुळेच शक्य झाला आहे, त्याच्यामुळेच ह्या डान्सची जोरदार चर्चा होत आहे. मी गाण्याला मिळालेल्या यशाबद्दल खूप आनंदी आहे. पण फक्त त्याचेच कौतुक न करता, सर्व डान्स कोरियोग्राफरचेही कौतुक व्हायला हवे. कारण जर त्या हूकस्टेप्स मी वेगळ्या पद्धतीने नसत्या केल्या तर या गाण्याची चर्चा झालीच नसती. माधुरी दीक्षित आणि सरोज खान यांचे कौतुक झाले, त्याप्रमाणेच इतरी कोरियोग्राफरलाही आता सन्मान देण्याची वेळ आलेली आहे." अशी प्रतिक्रिया कोरियोग्राफर बॉस्को मार्टिस यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT