Amir Salman Shahrukh SAAM TV
मनोरंजन बातम्या

Amir Salman Shahrukh : सलमान समोरच्या दारातून, पाठीमागील दारातून शाहरुख आला, आमिरच्या घरात तिन्ही खान एकत्र का आले?

Amir Salman Shahrukh Viral Video : बॉलिवूडचे सुपरस्टार सलमान खान , शाहरुख खान आणि आमिर खान एकत्र आले आहेत. त्यांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

बॉलिवूडचे तीन खान कायमच आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. नुकतेच सलमान खान (Salman Khan) , शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आमिर खान (Amir Khan) यांना एकत्र स्पॉट करण्यात आले आहे. ही तिघे एकत्र दिसण्याचा योग खूप कमी येतो. मध्यंतरी लग्नात नाटू नाटू गाण्यावर डान्स करताना सलमान खान , शाहरुख खान आणि आमिर खान यांना एकत्र स्पॉट करण्यात आले होते. तेव्हा त्यांचे खूप व्हिडीओ समोर आले होते. आता पुन्हा एकदा तीन खान एकत्र आले आहेत.

आमिर खानचा उद्या (14 मार्च) ला वाढदिवस आहे. याला सलमान खान आणि शाहरुख खाननेही हजेरी लावली होती. आमिर खानचा हा 60व्या वाढदिवस आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान, आमिर आणि शाहरुखच्या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये आमिर खानच्या घरी शाहरुख खान आणि सलमान खान येतो. तेव्हा आमिर खान शाहरुख खानला सोडण्यासाठी खाली उतरताना दिसतो.

व्हिडिओमध्ये शाहरुख खान फेस मास्क घातलेला दिसत होता. तिन्ही खानांनी पॅप्ससाठी पोज दिली नाही किंवा त्यांच्याशी बोले देखील नाही. सलमान खानही घराबाहेर जाताना दिसला. आमिर खानच्या घरी त्यांचे प्री-बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आले. तेव्हा तिन्ही खान एकत्र दिसले.चाहते सलमान खान , शाहरुख खान आणि आमिर खान यांचा एकत्र चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. सध्या सलमान खान त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सलमान खान या चित्रपटात रश्मिका मंदान्नासोबत पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT